Join us

न्यू ईअर पार्टीत अंकिता लोखंडे झाली भलतीच बोल्ड, गर्लगँगसोबतधम्माल सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 17:37 IST

Ankita Lokhande New Year Party : होय, अंकिताने गर्ल गँगसोबत धम्माल मस्ती केली. तिच्या पूल पार्टीचे फोटोंची व व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा आहे.

Ankita Lokhande New Year Party : बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी नव्या वर्षांचं धम्माल सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्वाधिक व्हायरल होत आहेत ते अभिनेत्री अंकिता लोखंडेचे (Ankita Lokhande ) व्हिडीओ. होय, अंकिताने गर्ल गँगसोबत धम्माल मस्ती केली. तिच्या पूल पार्टीचे फोटोंची व व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा आहे.

अभिनेत्री सना मकबूलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिता लोखंडे, मिष्टी त्यागी आणि अशिता धवन अशा सगळ्याजणी मजेशीर पोज देताना दिसून येत आहे. राखीने यात रेड व व्हाईट कलरची मोनोकिनी घातलेली दिसतेय.

अंकिता लोखंडेनेसुद्धा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.यातील एका व्हिडीओमध्ये अंकिता डीजे बनून पती विकी जैनसोबत धम्माल करताना दिसून येत आहे. अंकिताच्या पायाला दुखापत झाली आहे. पण तरिही दुखापत झालेल्या पायासोबत ती डान्स करताना दिसतेय. 

गेल्या 14 डिसेंबरला अंकिता व विकी जैन लग्नबंधनात अडकली होती. मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पडलं होतं. या लग्नाचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

लग्नाला काही दिवस उरले असताना अंकिता लोखंडेच्या पायाला दुखापत झाली होती. डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला देखील दिला होता. मात्र अंकिता तिच्या संगीत सेरेमनीमध्ये पायाच्या दुखापत विसरुन जोरादर डान्स करताना दिसली होती. तिच्या संगीत सेरेमनीला कंगना राणौतपासून अमृता खानविलकरपर्यंत सगळ्यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे अंकिताने तिच्या सासूबाईसोबत सुंदर डान्स केला होता.  

टॅग्स :अंकिता लोखंडे