अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande) रणबीर कपूर व आलिया भट (Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding) यांच्या लग्नाशी तसा दूरदूरपर्यंत संबंध नाही. पण काल रणबीर व आलियाचं लग्न झालं आणि या लग्नानंतर आज अचानक अंकिता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. होय, अनेकांनी अंकिताला ट्रोल करायला सुरूवात केली. आता अंकिताने असं काय केलं तर त्यासाठी तुम्हाला पुढची बातमी वाचावी लागेल.
तर काल 14 एप्रिलला आलिया व रणबीरचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर आलियानं लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो पाहून चाहते अक्षरश: वेडे झालेत. तुफान व्हायरल झालेल्या या फोटोनंतर अगदी आलियाच्या लुकपासून तिचं मंगळसूत्र, तिच्या वेडिंग रिंगपर्यंत चर्चा रंगल्या. अशात अंकिता लोखंडेनं असं काही केलं की, नेटकरी भडकले.
तर अंकिताने असं काय केलं तर लग्नाला 4 महिने पूर्ण झाल्यानिमित्त स्वत:च्या लग्नाचा एक फोटो शेअर केला. या फोटोंचा नेटकऱ्यांनी भलताच अर्थ काढला. रणबीर आणि आलियाचं लग्न झालं म्हणून अंकिताने स्वत:च्या लग्नाचे फोटो शेअर केले असं नेटकऱ्यांचं मत झालं. मग काय, अनेकांनी अंकिताला ट्रोल केलं. काहींनी तिला ‘Jealous’ म्हटलं. तर काहींनी ‘Insecure’ म्हटलं.
जेव्हा दुसऱ्याच्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर स्वत:च्या लग्नाचे फोटो दाखवण्याची इच्छा होते... खूप झालं आता बस कर..., अशी कमेंट एका युजरने केली. असुरक्षितपणाची हद्द झाली..., अशी कमेंट दुसºया एका युजरने केली. आलिया रणबीरच्या लग्नाचे फोटो पाहून इतकं वाईट वाटलं का? असा डिवचणारा प्रश्न एकाने केला. तू कायम जेलेस असते. हे फोटो आता पोस्ट करण्याची गरज काय? आलिया आणि रणबीर यांना या सगळ्याचा आनंद घेऊ दे,अशा शब्दांत एका नेटकऱ्याने अंकिताला लक्ष्य केलं.