Join us  

Ankita Lokhande wedding : अंकिता लोखंडे व विकी जैननं लग्नाआधी उरकला साखरपुडा, पाहा कपलचा रोमॅन्टिक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 12:56 PM

Ankita Lokhande engagement party : अंकिता विकीच्या बोटात साखरपुड्याची अंगठी घालत असतानाच अचानक सुशांतचं गाणं वाजायला लागलं, रोमॅन्टिक झालं जोडपं

सेलिब्रिटींचे लग्न म्हटले की  उत्सुकता असणारच. विकी कौशल आणि कतरिना कैफ  यांचं नुकतंच धुमधडाक्यात लग्न झालं. आता उद्या 14 डिसेंबरच्या मुहूर्तावर अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिचा बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार आहे.  तिच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरूवात झाली असून तिचे मेहंदी सोहळ्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता तिच्या साखरपुड्याचे व्हिडीओही इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. लग्ननाआधी अंकिता व विकीचा साखरपुडा झाला. या एंगेजमेंट पार्टीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

अंकिता आणि विकी हे 14 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. कोणतेही डेस्टिनेशन वेडिंग प्लान न करता या जोडप्याने सांताक्रुझमधील ग्रँड हयात हे ठिकाण लग्नासाठी निवडलं आहे.

लग्नाआधी अंकिताच्या हातावर विकीच्या नावाची मेहंदी सजली. काल अंकिता व विकी दोघांनी साखरपुडा केला. आज 13 तारखेला अंकिता व विकीच्या लग्नाचा हळदी समारंभ होणार आहे. शिवाय रात्री इंडो- वेस्टर्न म्युझिकच्या तालावर संगीत सोहळा रंगणार आहे. 

विकीचा होणारा पती विकी जैन हा मोठा बिझनेसमॅन आहे. तो गुजराती असला तरीही लग्नाचे सर्व विधी ही महाराष्ट्रीयन परंपरेनुसारच होणार आहे. रॉयल ट्रेडिशनल स्प्लेंडर अशी लग्नाची थीम आहे.

अंकिता व विकीच्या लग्नाआधी त्यांचा प्री-वेडिंग शूटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये अंकिता व विकी दोघांनी पांढºया रंगाचे कपडे घातले आहेत. यामध्ये अंकिता आणि विकी जैन वाळवंटात रोमॅन्टिक झालेले दिसत आहेत.  गेल्या महिन्याच्या अखेरीस, अंकितानं बॅचलर पार्टी एन्जॉय केली होती. ज्यामध्ये सृष्टी रोडे, अमृता खानविलकर, मृणाल ठाकूर, रश्मी देसाई यांच्यासह अंकिताच्या अनेक मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :अंकिता लोखंडे