Join us

'नुसती ओव्हर ॲक्टिंग करते ही.'; अंकिता लोखंडेचे एक्स्प्रेशन्स पाहून लोकांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 8:57 AM

Ankita lokhande : अंकिताने दिलेले एक्स्प्रेशन्स पाहून नेटकऱ्यांनी चांगलीच तिची खिल्ली उडवली आहे.

अंकिता लोखंडे (ankita lokhane) हे नाव सध्याच्या घडीला कोणासाठीही नवीन नाही. उत्तम अभिनयाच्या जोरावर अंकिताने छोट्या पडद्यावरून रुपेरी पडद्यावर उडी मारली. कंगना रणौतच्या (kangana ranut) 'मणिकर्णिका' या सिनेमात झळकलेली अंकिता अलिकडेच 'बिग बॉस 17' (bigg boss 17) या रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती. या शोमध्ये अंकिता अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. इतकंच नाही तर तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. सध्या सोशल मीडियावर अंकिताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा तिला ट्रोल व्हावं लागलं आहे.

अंकिता लवकरच 'वीर सावरकर' या सिनेमात अभिनेता रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. २२ मार्च रोजी रिलीज होणाऱ्या या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आला. त्यामुळे अंकिता सध्या चर्चेत आहे. यामध्येच अलिकडेच अंकिताला पापाराझींनी स्पॉट केलं. यावेळी तिने पापाराझींना आवाज कमी करा, असं सांगताना जे हावभाव केले ते पाहून लोकांनी तिला ट्रोल केलं आहे.

काय म्हणाले नेटकरी?

पापाराझींचा आवाज ऐकून अंकिता त्यांना हळू बोला असं सांगत होती. मात्र, यावेळी तिने जे एक्स्प्रेशन्स दिले हे पाहून लोकांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर 'ओव्हर ॲक्टिंगची दुकान' असंही काही जणांनी म्हटलं आहे. 'काय तोंडं करत फिरते', 'ओव्हर ॲक्टिंग तर बघा हिची', 'बाई जरा तो पदर नीट वर कर',अशा कितीतरी कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेबॉलिवूडटेलिव्हिजनसेलिब्रिटीरणदीप हुडा