Join us

क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त 'फुले' सिनेमाची घोषणा, हे कलाकार सावित्री-ज्योतीबांच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:56 PM

महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यावर आधारीत 'फुले' सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. (mahatma phule, phule)

आज महात्मा फुलेंची जयंती. स्त्रियांना समाजात आणि शिक्षणात समान वागणूक मिळावी म्हणून आयुष्यभर झटणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे आदरणीय व्यक्तिमत्व. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यावर आधारीत आगामी हिंदी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचं नाव 'फुले'. अनंत महादेवन दिग्दर्शित 'फुले' सिनेमाचं मोशन पोस्टर आज महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी लॉंच करण्यात आलंय.

'त्यांच्या जयंतीदिनी भारतातील पहिल्या महात्म्याला आदरांजली!', असं कॅप्शन देत 'फुले' सिनेमाचं मोशन पोस्टर लॉंच करण्यात आलंय. या पोस्टरमध्ये गावातील एक पायवाट, मागे देऊळ, सुर्योदय, उडणारे पक्ष्यांचे थवे असं दिसत असून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पाहायाला मिळतात. अभिनेता प्रतीक गांधी महात्मा फुलेंच्या भूमिकेत झळकत आहे तर अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

अनंत महादेवन यांनी 'फुले' सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. गेली अनेक वर्ष हा सिनेमा रिलीज झालेला नाही. सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लूक आऊट होऊनही अनेक दिवस झाले. अखेर आज 'फुले' सिनेमाची अधिकृत  घोषणा करण्यात आलीय. 'फुले' सिनेमा यावर्षी रिलीज होण्याची दाट शक्यता आहे. प्रतीक गांधी-पत्रलेखा यांना ज्योती-सावित्रीच्या भूमिकेत पाहायला सर्व उत्सुक असतील यात शंका नाही.

 

टॅग्स :महात्मा फुले वाडासावित्रीबाई फुलेपत्रलेखाबॉलिवूड