Join us

पॅरिसमध्ये बॉलिवूड अभिनेत्याची झाली लूटमार; मौल्यवान वस्तू केल्या लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 13:36 IST

Annu kapoor: या अभिनेत्याची लूटमार करण्यात आली असून त्याच्या जवळील मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत.

बॉलिवूड कलाकार बऱ्याचदा नवनवीन ठिकाणांना भेट देत असतात. यात अनेकदा ते फॉरेन कंट्रीमध्ये जाताना दिसतात. मात्र, विदेशात गेलेल्या एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याची चांगलीच फसवणूक झाली आहे. पॅरिसमध्ये फिरायला गेलेल्या या अभिनेत्याची लूटमार करण्यात आली असून त्याच्या जवळील मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत.

लोकप्रिय अभिनेता अन्नू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांची आपबिती सांगितली आहे. तसंच त्यांची कशाप्रकारे फसवणूक झाली हेदेखील सविस्तरपणे सांगत इतरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

"माझी प्राडा बँग चोरीला गेली आहे. या बँगेत माझी स्विस कॅश, युरो आणि काही फ्रेंच चलन होते. तसंच त्यात आयपॅड, डायरी, क्रेडिट कार्ड सुद्धा होते. ते लोक माझ्या सगळ्या वस्तू घेऊन गेले. त्यामुळे जर तुम्ही फ्रान्समध्ये प्रवास करत असाल तर काळजी घ्या. इथे खिसेकापू खूप आहेत. आता मी या प्रकरणी पोलिस तक्रार करणार आहे. येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मला मदतीचं आश्वासन दिलं आहे", असं अन्नू कपूर यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अन्नू कपूर यांनी ही पोस्ट शेअर करत फ्रान्सचे अधिकारी, मंत्री आणि भारतीय दुतावास यांना टॅग केलं आहे. अन्नू कपूर यांच्यापूर्वी सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या बड्या कलाकारांनाही अशा प्रसंगांचा सामना करावा लागला आहे.

टॅग्स :अन्नू कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी