‘बाहुबली-२’ उद्या करणार आणखी एक धमाका? वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2017 11:09 AM2017-05-30T11:09:36+5:302017-05-30T16:43:48+5:30
जगभरात धूम उडवून देणारा ‘बाहुबली-२’ हा चित्रपट उद्या आणखी एक धमाका करण्याची शक्यता आहे. एकीकडे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर ...
ज भरात धूम उडवून देणारा ‘बाहुबली-२’ हा चित्रपट उद्या आणखी एक धमाका करण्याची शक्यता आहे. एकीकडे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान चीनमध्ये कमाईचा उच्चांक गाठत असताना, ‘बाहुबली-२’ बॉक्स आॅफिसवर एक नवा अध्याय लिहिणार आहे. होय, ‘बाहुबली-२’ उद्या पाचशे कोटी रुपयांच्या क्लबमध्ये स्थान मिळविणार असून, हा बॉक्स आॅफिसवर असा कारनामा करणारा हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे. त्याचबरोबर पाचशे कोटी क्लबची सुरुवात करणारा ‘बाहुबली-२’ हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे.
बाहुबली-द कंन्क्लूजन’च्या हिंदी व्हर्जनने पाचव्या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाने ४९८.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. शिवाय अजूनही ‘बाहुबली-२’चा जोर कायम असल्याने उद्या हा चित्रपट पाचशे कोटी क्लबमध्ये स्थान मिळविण्याचे निश्चित समजले जात आहे. जर आज दिवसभरात या चित्रपटाने एक कोटी रुपयांची कमाई केल्यास हा चित्रपट उद्यापासून पाचशे कोटी क्लबला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
हा चित्रपट रिलीज झाल्याच्या दोन आठवड्यांनंतर, ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘हाफ गर्लफ्रेण्ड’, ‘हिंदी मीडियम’ आणि ‘सचिन : अ बिलिअन ड्रीम’ हे चित्रपट रिलीज झाले. मात्र अशातही ‘बाहुबली-२’च्या कमाईला ब्रेक लागला नाही. उलट देशातील काही भागांमध्ये आजही चित्रपटाचे शो जोरात सुरू असल्याचे आकडेवारीवरून समोर येते. हा चित्रपट रिलीज होऊन पाच आठवडे पूर्ण झाले आहे. अशातही बॉक्स आॅफिसवर याच चित्रपटाचा बोलबाला आहे.
‘बाहुबली-२’च्या वर्ल्डवाइड कलेक्शनविषयी बोलायचे झाल्यास आतापर्यंत १६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. सध्या आमिरच्या दंगल आणि बाहुबलीमध्ये कमाईवरून घमासान सुरू असून, यामध्ये कोण बाजी मारणार हे बघणे मजेशीर ठरेल. मात्र ‘बाहुबली-२’ने मारलेली मुसंडी पाहता हाच चित्रपट कमाईत आघडी घेण्याची शक्यता आहे. भारतात या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. असा पराक्रम करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.
आता लवकरच ‘बाहुबली-२’ चीनमध्ये रिलीज केला जाणार असून, याठिकाणी आमिरच्या दंगलला ब्रेक लावण्याची शक्यता आहे. जर चिनी बॉक्स आॅफिसवर ‘बाहुबली-२’ने कमाईचा जोर ठेवल्यास हा चित्रपट ‘दंगल’ला मागे टाकणारच. शिवाय दोन हजार कोटी रुपयांच्या क्लबमध्ये स्थान मिळविण्यासही यशस्वी होईल, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.