दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील दिग्दर्शक के आर सच्चिदानंदन यांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे गुरुवारी निधन झाले. त्यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. के आर सच्चिदानंदन हे मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सैची या नावाने ओळखले जायचे. ‘अय्यपनम कोशियुम’ या चित्रपटातून त्यांना ओळख मिळाली होती
टाइम्स नाउच्या रिपोर्टनुसार सच्चिदानंद यांची तब्बेत बिघडल्यामुळे १६ जून रोजी त्यांना केरळमधील त्रिसूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. पण गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सच्चिदानंदन यांना श्रद्धांजली वाहत आहेत.