Join us

पॉवरहाऊस परफॉर्मर राजकुमार रावने पटकावला आणखी एक प्रतिष्ठित सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 19:08 IST

Rajkumar Rao : राजकुमार रावने त्याच्या दमदार कामगिरीसह २०२३ मध्ये अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

राजकुमार राव(Rajkumar Rao) ने त्याच्या दमदार कामगिरीसह २०२३ मध्ये अनेक पुरस्कार पटकावले आहेत. काही खास पुरस्कारांनी सन्मानित झाल्यानंतर बी-टाउनच्या शेपशिफ्टरने GQ मोस्ट इंफ्लुशियल यंग इंडियन्स अवॉर्ड पटकावला. अशा प्रतिष्ठित विजयांसह चाहत्यांनी आता अभिनेत्याला 'राजकुमार वाह' असे संबोधण्यास सुरुवात केली आहे. कारण अभिनेता कोणतीही कसर सोडत नाही आणि मजबूत कथा आणि आणखी उत्तम काम करत आहे.

भूमी पेडणेकर सह-अभिनेत्री अनुभव सिन्हा यांच्या भीडमधील राजकुमार रावच्या दमदार आणि प्रभावी अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले. भीड हा २०२३ चा सर्वात समीक्षकांनी प्रशंसित चित्रपट बनला आहे. अभिनेता राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. 'बधाई दो' या सिनेमासाठी त्याने हा पुरस्कार पटकावला. 

राजकुमार राव याने अलीकडेच त्यांच्या बहुप्रतिक्षित स्त्री २च्या रिलीजची तारीख जिओ स्टुडिओ इव्हेंटमध्ये त्यांच्या टीमसोबत भव्य पद्धतीने जाहीर केली. २०२३ मध्ये राव कडे मिस्टर आणि मिसेस माही, गन्स आणि गुलाब आणि श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक देखील आहे; ज्याचा टीझर नुकताच रिलीज झाला. राजकुमार याचे आगामी प्रोजेक्ट्स बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

टॅग्स :राजकुमार राव