Join us

​दंगलच्या नावे आणखी एक विक्रम : सर्वांत जलद एक लाख तिकिटांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2016 5:41 PM

आमिर खानचा दंगल हा चित्रपट अनेक बाबतीत वेगळा ठरला आहे. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवरील रेकार्ड मोडेल किंवा नाही याबद्दल ...

आमिर खानचा दंगल हा चित्रपट अनेक बाबतीत वेगळा ठरला आहे. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवरील रेकार्ड मोडेल किंवा नाही याबद्दल आताच सांगता येणार नाही, मात्र ‘दंगल’ने बुक माय शो’ या आॅनलाईन बुकिंग संकेतस्थळावर अनेक नवे उच्चांक गाठले आहेत. या चित्रपटांने आॅनलाईन सर्वांत जलद एक लाख तिकिटांच्या विक्रीचा उच्चांकही या चित्रपटाने गाठला आहे. एकू ण तिकीट विक्रीपैकी ४० टक्के बुकिंग ‘बुक माय शो’च्या माध्यमातून झाले आहे हा देखील एक नवा विक्रमच आहे. दंगल या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीपासूनच आमिरच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. यामुळे पहिल्या दिवशीच हा चित्रपट हाऊसफुल्ल ठरला. दंगलच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आॅनलाईन बुकिंगचा नवा विक्रम केला आहे. आॅनलाईन तिकिट विक्री करणारे ‘बुक माय शो’या संकेतस्थळाच्या माध्यमातून २० कोटी रुपयांची तिकिटांची विक्री केली आहे. आॅनलाईनच्या माध्यमातून सर्वाधिक विक्री करणारा दंगल हा पहिला चित्रपट ठरला आहे. ‘बुक माय शो’वरून तब्बल एक लाख तिकिटांची विक्री करण्यात आली आहे. ही संख्या एकूण तिकिट विक्रीच्या ४० टक्के आहे. ‘बुक माय शो’च्या माध्यमातून देशभरातील बहुतेक सर्व थिएटरमधील तिकिटांची खरेदी क रता येते. या संकेतस्थळावरून कमीत कमी सेवा शुल्क आकारण्यात येत आहे. बुक माय शोचे सीईओ आशिष सक्सेना म्हणाले, आम्हाला आमिरच्या आगामी चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळेल असा अंदाज होता. मात्र, याचे कलेक्शन आनंद वाढविणारे आहे. ‘दंगल’ला चांगले रिव्ह्यू मिळत असून, नोटबंदीचा देखील त्यावर फारसा फरक पडलेला दिसत नाही. दंगलच्या आॅनलाईन बुकिंगसाठी ‘बुक माय शो’च्या विविध आॅफर्सचा फायदा घेत तिकिटांची खरेदी क रता येते. आम्ही दंगलच्या पहिल्या ओपिनिंग कलेक्शनमध्ये मोलाची भूमिका बजावत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. असेही त्याने सांगितले.दंगल हा चित्रपट या वर्षीचा सर्वाधिक ओपनिंग मिळविणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. सुमारे एका आठवड्यासाठी मुंबईतील सर्व चित्रपटगृहांची अ‍ॅडव्हांस बुकिंग झालू असल्याचे सांगण्यात येत आहे.