बॉलिवूडमध्ये दिसणार आणखी एक साऊथचा चेहरा; जाणून घ्या कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 5:47 AM
साऊथच्या अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडने एक वेगळी ओळख दिलीयं. प्रसिद्धी आणि लोकप्रीयतेच्या यशोशिखरावर नेऊन पोहोचवलेयं. त्यामुळेच साऊथच्या अभिनेत्रींना बॉलिवूड कायमचे ...
साऊथच्या अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडने एक वेगळी ओळख दिलीयं. प्रसिद्धी आणि लोकप्रीयतेच्या यशोशिखरावर नेऊन पोहोचवलेयं. त्यामुळेच साऊथच्या अभिनेत्रींना बॉलिवूड कायमचे खुणावत आलेय. बॉलिवूडमध्ये संधी मिळावी हे म्हणूनच साऊथच्या प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. साऊथची अभिनेत्री गायत्री अय्यर हिचेही हेच स्वप्न होते आणि विशेष म्हणजे, तिचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. होय, ‘रेड’ या चित्रपटाद्वारे गायत्री बॉलिवूड डेब्यू करतेय. या चित्रपटात गायत्री अजय देवगण सारख्या आघाडीच्या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. खरे तर बहुतांशवेळी साऊथ नट्या ग्लॅमरस भूमिकांसोबत बॉलिवूड डेब्यू करताना दिसतात. पण गायत्री याबाबतीत वेगळी आहे. होय, या चित्रपटात ती आयकर गुप्तचराच्या भूमिकेत दिसणार आहे आणि गायत्री यामुळेच जाम खूश आहे. बॉलिवूडमधील माझी सुरुवात एका वास्तववादी भूमिकेने होतेय, याचा मला आनंद आहे. दाक्षिणात्य चित्रपटांत काम करतानाही अशाच भूमिकांकडे माझा कल राहिला. झाडांच्या आजुबाजूला नाचायला मी घाबरते, म्हणून नव्हे तर वास्तववादी भूमिका एक वेगळे समाधान देऊन जातात. याऊलट ग्लॅमरस भूमिका सरतेशेवटी नीरस वाटून जातात, असे गायत्री म्हणाली. अजयसोबत काम करण्याच्या अनुभवांवरही ती बोलली. अजय देवगण यांच्यासोबत काम करायला मिळणार, हे ऐकूनच मी इतके भारावले होते की, ते मी शब्दांत सांगू शकत नाही. सेटवर त्यांनी मला प्रचंड प्रभावित केले. त्यांच्या वागण्यात कुठलाही खोटेपणा नाही. आपल्या सहकाºयांशी ते तितक्याच प्रामाणिकपणे वागतात. जे काही करतात ते संपूर्ण निष्ठेने करतात, असे गायत्री म्हणाली.गायत्रीने अनेक कन्नड चित्रपटांत काम केले आहे. तिचा पहिला तेलगू सिनेमा ‘सिक्स’ येत्या जूनमध्ये रिलीज होतो आहे. मूळची केरळची असलेल्या गायत्रीने तायक्वांडो शिकले आहे. तिचा आत्मविश्वास आणि कामाप्रतिची निष्ठा पाहता बॉलिवूडमध्ये एक मोठी खेळी खेळण्यास ती तयार आहे, असेच दिसतेय.