Join us

Sonu Sood : चाहत्यांनी उभारलं सोनू सूदचं आणखी एक मंदिर, सोनू म्हणतो, 'मंदिर नको तर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 15:44 IST

सोनूचे हे मंदिर आंध्र प्रदेशमध्ये उभारण्यात आले आ

Sonu Sood :  अभिनेता सोनू सूद कोरोनाच्या कठीण काळात अनेक लोकांसाठी देवदूतच बनला. एका शहरातून किंवा राज्यात किंवा शहरात जाणेही शक्य नव्हते तेव्हा सोनू ने अनेकांना देशाबाहेर जाण्यासाठीही मदत केली. दिवसरात्र सोनू याच कामात स्वत: व्यस्त असायचा. यामुळेच आजही सोनूच्या घराबाहेर चाहत्यांची रांग लागलेली असते. इतकंच नाही तर काही ठिकाणी सोनू सूदचंमंदिरही उभारण्यात आलं आहे. सोनूने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत मात्र सोबतच त्यांना एक आवाहनही केलंय.

सोनूने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो चाहत्यांच्या गराड्यात दिसतोय. तर सोनूचा पुतळा एके ठिकाणी उभारण्यात आला आहे आणि त्यावर फुलांचा वर्षाव केला जातोय. यामागे एक बॅनरही लावण्यात आला आहे ज्यावर लिहिले आहे भारताचा खरा हिरो सोनू सूद मंदिर. सोनू स्वत: त्याठिकाणी पोहोचलेला आहे. चाहत्यांच्या गर्दीत तो सर्वांचेच आभार मानत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सोनूने लिहिले, 'मी भावूक झालो आहे. माझा खरं तर यावर हक्क नाही पण तुम्हाला काही करायचेच असेल तर रुग्णालय आणि शाळा उभारा. जय हिंद.'

सोनूचे हे मंदिर आंध्र प्रदेशमध्ये उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे चौथे मंदिर आहे. यापूर्वी साऊथमध्येच तीन मंदिरे उभारण्यात आली आहेत. 

टॅग्स :आंध्र प्रदेशसोनू सूदमंदिर