Join us  

​गायिका सुचिता कृष्णमूर्ती हिचे अजानविरोधी ट्विट; नेटिजन्सचा रोष अनावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2017 8:27 AM

काही दिवसांपूर्वी गायक सोनू निगमने अजानविरोधात ट्विट करून वाद ओढवून घेतला होता. आता गायिका अभिनेत्री सुचिता कृष्णमूर्ती ही सुद्धा ...

काही दिवसांपूर्वी गायक सोनू निगमने अजानविरोधात ट्विट करून वाद ओढवून घेतला होता. आता गायिका अभिनेत्री सुचिता कृष्णमूर्ती ही सुद्धा अशाच वादात सापडली आहे. अजानविरोधात केलेल्या एका ट्विटमुळे ती टीकेचे धनी ठरली आहे. समाजवादी पक्षाने तिची खिल्ली उडवली आहे. २३ जुलैच्या रात्री सुचिताने अजानवर ट्विट केले होते. ‘पहाटे पावणे पाचला घरी आल्यावर अजानचा कर्णकर्कश आवाज ऐकावा लागला. अशा प्रकारे एखादा धर्म लादणे यापेक्षा दुदैर्वी काहीच असू शकत नाही’, असे तिने या ट्विटमध्ये म्हटले होते.तिच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेकांनीच तिला आडव्या हाताने घेतले. इतके कमी की काय, म्हणून समाजवादी पक्षाच्या जुही सिंग यांनी सुचिताला फैलावर घेतले. सुचिताप्रमाणे अशी बेताल वक्तव्य यापूर्वीही काहीजणांनी केली आहेत. मला या लोकांची मानसिकताच कळत नाही. मला कळत नाही, पवित्र अजानचा तिला (सुचित्राला) काय त्रास होतो? बहुधा तिला झोप जास्त प्रिय असावी, असे  जुही सिंग यांनी म्हटले आहे.सुचिताच्या अजानविरोधी ट्विटनंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.  या विरोध करणाºयांवरही सुचिता बरसली. ‘आजूबाजूच्या संपूर्ण परिसरातील लोकांना पहाटे पाच वाजता उठवणे हे असभ्यतेचे लक्षण आहे. मी सकाळी उठल्यावर माझी प्रार्थना आणि रियाज करते. असे जाहिरपणे लाऊडस्पीकरचा वापर करुन इतरांनी मला देवाची किंवा धार्मिक रुढींची आठवण करुन देण्याची काहीच गरज नाही, अशा शब्दांत तिने तिची बाजू मांडली. काही महिन्यांपूर्वी गायक सोनू निगमनेही अजानविषयी एक ट्विट केले होते. त्याच्याट्विटवरून बराच मोठा गदारोळ झाला होता. या सर्व प्रकरणी सोनूने मुंडनदेखील करुन घेतले होते.