Join us

अनु मलिकचा भाऊ अबू मलिक ढसाढसा रडला...; पाळीव कुत्र्याचा फोटो घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 17:39 IST

video : बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार व गायक अनु मलिकचा भाऊ अबू मलिकचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत अबू ढसाढसा रडताना दिसतोय.

ठळक मुद्देअबु मलिक हाही भाऊ अनु मलिकसारखा म्युझिक कंपोझर व राईटर आहे. त्याची स्वत:ची एक कंपनी आहे. याद्वारे तो जगभर लाईव्ह शो आयोजित करतो.

बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार व गायक अनु मलिकचा (Anu Malik ) भाऊ अबू मलिकचा (Abu Malik) एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत अबू ढसाढसा रडताना दिसतोय. त्याच्या हातात त्याच्या लाडक्या पाळीव कुत्र्याचा फोटो आहे. आता ही काय भानगड आहे, अनु मलिकचा भाऊ असा का रडतोय, ते जाणून घेऊ या.

या व्हिडीओत अबूला अश्रू आवरणं कठीण जातंय. पेट डॉग जेगिज खानचा फोटो दाखवत तो या व्हिडीओ म्हणतो, ‘हा माझा पेट. मी त्याला एक्स-रे काढण्यासाठी क्लिनिकमध्ये घेऊन गेलो होतो. पण त्यांनी त्याचा मृतदेहचं माझ्या हातावर ठेवला. या दु:खामुळे गेल्या पाच दिवसांपासून आमच्या घरी ना कोणी जेवलंय, ना कोणी झोपलंय. मी आता याची एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात आलो आहे. ज्याला एका जीवाची किंमत माहित नाही, त्याला शिक्षा मिळावी, अशी माझी इच्छा आहे. जगात आणखीही खूप समस्या आहेत. पण आम्ही आमचा लाडका कुत्रा गमावला आहे. तो फक्त आमचा पाळीव कुत्रा नव्हता तर माझा जीव की प्राण होता. माझी बायको रात्रंदिवस रडतेय. मी रडतोय. माझी इच्छा आहे की, प्राणीप्रेमींनी मला सपोर्ट करावा.’अबु मलिक हाही भाऊ अनु मलिकसारखा म्युझिक कंपोझर व राईटर आहे. त्याची स्वत:ची एक कंपनी आहे. याद्वारे तो जगभर लाईव्ह शो आयोजित करतो.

टॅग्स :अनु मलिक