केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांनी पुकारलेले आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. ना शेतकरी मागे हटायला तयार आहेत, ना केंद्र सरकार आपला नवा कायदा मागे घेण्याच्या मूडमध्ये आहे. अशात शेतकरी आंदोलनादरम्यानचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत आणि या व्हिडीओवर ‘क्राईम पट्रोल’चा अँकर व अभिनेता अनुप सोनी याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ खरा की खोटा याबद्दल आम्ही दावा करणार नाही. मात्र अनुप सोनीने हा व्हिडीओ शेअर करत एक ट्विट केले आहे.या व्हिडीओत महिलांचा एक गट गाणे गात पीएम मोदी यांचा निषेध व्यक्त करत आहे. मात्र या गाण्याचे बोल आक्षेपार्ह आहेत. ‘रेल बेचके खा गया रे मोदी, मर जा ते, हाय हाय मोदी मरजा तू...,’ असे या महिला म्हणत आहेत. अनेक लोकांनी महिलांच्या या गाण्याचा विरोध केला आहे. अनुप सोनी सुद्धा त्यापैकीच एक़ ‘असे व्हायला नको, हे चूक आहे,’ अशा शब्दांत त्याने या महिलांच्या निषेधाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
अलीकडे अनुप सोनी काम मागताना दिसला होता. ‘ हे नशीब म्हणायचे की, चित्रपट निर्माते माझा विचार करत नाही. त्यांची चूक आहे, असे मी म्हणणार नाही. त्यांच्याकडे माझ्यासाठी नक्कीच भूमिका असाव्यात. पण मी बराच काळ क्राईमवर आधारीत शोमध्ये व्यग्र होतो. त्यादरम्यान चित्रपट निर्माते माझ्याकडे ऑफर्स घेऊन आले होते मात्र माझ्याकडे तारखा उपलब्ध नसल्यामुळे मी त्यांना नकार दिला होता. आता कदाचित माझे बिझी शेड्युल पाहून त्यांनी मला ऑफर देण्यात फायदा नाही असा विचार केला असेल. पण आता मला काम हवे आहे. मी निर्मात्यांकडे जाऊन स्वत: काम मागत आहे. यात मला अजिबात लाज वाटत नाही,’असे तो म्हणाला होता.बालिका वधू या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अनुप सोनी राज बब्बर यांचा जावई आहे. अनुप सोनीने क्राईमवर आधारीत ‘क्राईम पट्रोल’ या शोचे बराच काळ सूत्रसंचालन केले. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या गंगाजल आणि अपहरण चित्रपटातही तो झळकला आहे.
राज बब्बरच्या जावयावर आता का आली काम मागण्याची वेळ, एकेकाळी नाकारले होते सिनेमे