अनुपम खेर यांनी आईसाठी विकत घेतले सिमालमध्ये घर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2017 5:16 AM
अनुमप खेर यांनी ही माहिती देताना एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओव्दारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
अनुमप खेर यांनी ही माहिती देताना एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओव्दारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझे वडिल वन विभागात क्लर्क होते. त्यामुळे आम्ही एकतर सरकारी इमारतीत नाही तर भाड्याच्या घरात राहिलो. काही कारणांमुळे आम्ही शिमलात घर नाही घेऊ शकलो. आपण भारतीय जिथे मोठे होतो तिथे आपल्या घर असावं ही इच्छा ठेवतो. आज मी सिमलामध्ये एक छोटेसे घर खरीदे केले आहे. हे घर मी माझ्या आईला गिफ्ट देऊ इच्छितो. हे घर बघायला माझे वडिल जिवंत असायला हवे होते त्यांना या गोष्टीचा नक्कीच आनंद झाला असता.अनुपम खेर यांना 3 दशकांपेक्षा जास्त वेळ बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवले आहे. दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी बॅलचर डिग्री पूर्ण केली आहे. 1982मध्ये त्यांनी आगमन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती सारांश या चित्रपटातून. सारांशसाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याच्या पुरस्कार प्राप्त झाला.1986 साली सुभाष घई यांच्या आलेल्या कर्मा या चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका साकारण्याचा संधी मिळाली आणि या संधीचे त्यांनी सोने केले. याचित्रपटात त्यांच्यासोबत दिलीप कुमार ही होते मात्र प्रेक्षकांना लक्षात राहिले ते अनुपम खेर. अनुपम खेर यांनी 500 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना 5 वेळा दर्जेदार अभिनयासाठी फिल्म फेअरचा अॅवॉर्ड पटकावला आहे.