Join us

अनुपम खेर ते डॉ. मनमोहन सिंग असा तयार झाला लूक, पहा हा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 7:54 PM

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्देअनुपम खेर यांचा लूक तयार करण्यासाठी दररोज लागायचे २ ते ३ तास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अनुपम खेरमनमोहन सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनुपम खेर यांचा हुबेहुब मनमोहन सिंग यांच्यासारखा लूक तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. त्याचाच मेकिंग व्हिडिओ अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

अनुपम खेर यांचा लूक तयार करण्यासाठी दररोज २ ते ३ तास लागत असत. अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडिओवरून डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखा लूक तयार करण्यासाठी त्यांना किती मेहनत घ्यावी लागली असेल, याचा अंदाज येतो. मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक असल्याचे त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले होते. त्यांचा राजकिय जीवनपट जवळून अनुभवता आला, असेही त्यांनी म्हटले होते. 

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र, प्रदर्शित होताच हा चित्रपट वादात अडकला. यात राजकिय हस्तक्षेप असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अनुपम खेर त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. ११ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनुपम खेर यांच्याशिवाय अक्षय खन्ना, अर्जुन माथुर, बिपीन शर्मा, दिव्या सेठी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अक्षय खन्नाने यात संजय बारू यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

टॅग्स :अनुपम खेरमनमोहन सिंग