Join us

Video: "तुम्हाला जायला पाहिजे"; सर्वांसमोर अनुपम खेर यांनी महेश भट यांना स्टेजवरुन खाली पाठवलं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:12 IST

अनुपम खेर यांनी महेश भट यांना सर्वांसमोर स्टेज सोडायला सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत (anupam kher, mahesh bhat)

बॉलिवूडमध्ये अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहून नेटकऱ्यांना चांगलाच धक्का बसतो. कधी कोणी सेलिब्रिटी कुठल्यातरी इव्हेंटमध्ये एकमेकांकडे दुर्लक्ष करतं, तर कोणी समोर असूनही एकमेकांशी बोलणं टाळतं. बॉलिवूडमधून असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत अनुपम खेर (anupam kher) दिग्गज निर्माते-दिग्दर्शक महेश भट (mahesh bhat) यांना स्टेजवरुन खाली जायला सांगतात. पुढे काय घडलं बघा?

अनुपम खेरमहेश भट यांना काय म्हणाले?

अनुपम खेर आगामी 'तुमको मेरी कसम' सिनेमात अभिनय करत आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटला अनुपम खेर सर्व स्टारकास्टसोबत फोटोशूट करत होते. महेश भट अनुपम यांच्या खांद्यावर हात ठेऊन फोटोशूट करत असतात. त्यावेळी अचानक अनुपम खेर "आपको जाना चाहिए" असं म्हणतात. त्यामुळे महेश भट स्टेजवरुन खाली उतरतात. "काय झालं, काय झालं", असं लोक महेश भट्ट यांना विचारतात. "मला जायला सांगितलंय." असं म्हणत महेश भट्ट हॉलमधून बाहेर जातात.

अनेकांना हा व्हिडीओ पाहून अनुपम खेर यांनी महेश भटचा सर्वांसमोर अपमान केला, असं वाटलं. परंतु अनुपम आणि महेश यांची गेल्या अनेक वर्षांपासून मैत्री आहे, त्यामुळे मैत्रीच्या खातर अनुपम  यांनी महेश यांना स्टेज सोडायला सांगितला. त्यामागे दुसरं कोणतंही कारण नाही, असंही नेटकरी म्हणत आहे. दरम्यान विक्रम भट दिग्दर्शित 'तुमको मेरी कसम' सिनेमा २१ मार्च २०२५ ला रिलीज होणार आहे.

टॅग्स :अनुपम खेरमहेश भटबॉलिवूड