Anupam Kher Net Worth: अनुपम खेर आहेत कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक, दरमहा किती कमावतात? जाणून घ्या..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 11:12 AM2022-03-07T11:12:06+5:302022-03-07T11:12:38+5:30
बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी आपल्या करिअरमध्ये जबरदस्त हिट सिनेमे दिले आहेत. त्यांनाही आपल्या करिअरच्या सुरुवातीला खूप मेहनत घ्यावी लागली होती.
बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी आपल्या करिअरमध्ये जबरदस्त हिट सिनेमे दिले आहेत. त्यांनाही आपल्या करिअरच्या सुरुवातीला खूप मेहनत घ्यावी लागली होती. याच मेहनतीचं फळ त्यांना मिळालं आणि आज त्यांचं नाव बॉलीवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं. अनुपम खेर यांनी आपण करत असलेलं काम दिवसेंदिवस आणखी गुणवत्तापूर्ण कसं करता येईल यासाठी प्रयत्न केले. अनुपम खेर यांचा आज ६७ वा वाढदिवस आहे. खेर आज कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत.
caknowledge च्या माहितीनुसार खेर यांची नेटवर्थ ४०० कोटींच्या जवळपास आहे. त्यांची दरमहिन्याची कमाई ३ कोटी रुपयांहून अधिक आहे. तसंच वर्षाकाठी खेर तब्बल ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करतात. गेल्या काही वर्षात खेर यांची एकूण संपत्ती ३० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. अनुपम खेर अभिनयासोबतच निर्माते, दिग्दर्शक आणि काही व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक कमाई करतात. याशिवाय खेर अनेक संस्थांना देखील मदत करतात आणि आयकर देखील भरतात.
घर
अनुपम खेर यांचे मुंबईत दोन फ्लॅट आहेत. एक अंधेरी आणि दुसरा जुहू येथे आहे. यांची किंमत ५ कोटींहून अधिक आहे. तसंच देशात आणखी काही रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये त्यांची गुंतवणूक आहे.
वाहनं
अनुपम खेर यांच्याकडील वाहनांबाबत बोलायचं झालं तर त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू, सॉर्पियो सारख्या कार आहेत.
अनुपम खेर यांनी 1982 साली 'आग' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर त्यांनी 'सारांश' चित्रपट केला. या चित्रपटात अनुपम यांनी तरुण वयातच वृद्धाची भूमिका साकारली होती. त्यांना करिअरच्या सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. मात्र, हळूहळू त्यांना ओळख मिळाली. तेव्हापासून अनुपम यांनी 500 चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त अनुपम यांनी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही काम केले आहे. अनुपम निर्मात्याशिवाय दिग्दर्शकही आहेत. निर्माता म्हणून त्यांनी 'बरीवाली', 'मैने गांधी को नही मारा', 'तेरे संग' आणि 'रांची डायरीज' सारखे चित्रपट दिले आहेत. याशिवाय त्यांनी 'ओम जय जगदीश' नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
अनुपम खेर शेवटचे 2018 मध्ये आलेल्या 'हॉटेल मुंबई' या चित्रपटात दिसले आहेत. यानंतर आता ते आणखी ३ चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. ज्यात 'कार्तिकेय 2', 'कनेक्ट' आणि 'शिवशास्त्री बल्बोआ'मध्ये दिसणार या चित्रपटांचा समावेश आहे.