अनुपम खेर यांनी त्यांच्या पहिल्या नाटकाविषयी सांगितली ही गोष्ट, वाचून तुम्ही देखील पोट धरून हसाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 01:44 PM2019-07-13T13:44:08+5:302019-07-13T13:45:13+5:30
अनुपम यांनी त्यांच्या शालेय जीवनातील एक मजेदार किस्सा त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.
सारांश या आपल्या पाहिल्याच चित्रपटात केलेल्या 65 वर्षांच्या वृद्ध निवृत्त शिक्षकाच्या भूमिकेपासून ते न्यू अॅमस्टरडॅम नामक आंतरराष्ट्रीय मालिकेत ‘डॉक्टर विजय कपूर’ पर्यंत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारणारे आणि अत्यंत प्रशंसनीय कामगिरी करणारे अभिनेते अनुपम खेर यांना प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे. ते गेल्या 35 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत असून त्यांनी आजवर अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
रसिकांच्या मनात अनुपम खेर यांचं वेगळं स्थान आहे. 'सांराश' सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अनुपम खेर यांचा जीवनप्रवास कधीच सोपा नव्हता. मात्र सारांश सिनेमानंतर आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि अभिनयामुळे त्यांनी रसिकांची मनं जिंकली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्या आयुष्यात आलेले चढ-उतार प्रेक्षकांना आता त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये वाचता येणार आहेत. लेसन्स लाईफ टॉट मी, अननोव्हिंगली ही अनुपम यांची ऑटोबायोग्राफी ऑगस्ट महिन्यात लोकांच्या भेटीस येणार आहेत.
अनुपम यांच्या ऑटोबायोग्राफीतील एक किस्सा त्यांनी नुकताच त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनुपम यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांचा अभिनयातील पहिला आणि मजेशीर अनुभव सांगितला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिले आहे की, अभिनय करण्याचा माझा पहिला प्रयत्न भयानक होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी पाचवीत असताना एका नाटकात काम केले होते. त्यावेळी या नाटकातील माझा सहकलाकार हा माझ्यापेक्षा लठ्ठ होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण चक्क त्याने मला उचलून ऑडियन्समध्ये फेकून दिले होते. सिमलामधील माझे आयुष्य खूपच छान होते. माझ्या आयुष्यातील असे अनेक गमतीदार किस्से तुम्हाला माझ्या ऑटोबायग्राफीमध्ये वाचायला मिळणार आहेत.
My first attempt at acting was a disaster. In the 5th standard school play my co actor being stronger than me threw me in the audience. Back then in Shimla these were excitements we lived for. Listen to this story from my autobiography #LessonsLifeTaughtMeUnknowingly. 😍🤣🤓😂 pic.twitter.com/1Jwp0uvGen
— Anupam Kher (@AnupamPKher) July 12, 2019
अनुपम यांनी इन्स्टाग्रामद्वारे त्यांच्या ऑटोबायग्राफीविषयी त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते मी, माझे आयुष्य एका ओपन बुकसारखे आहे. एका छोट्याशा गावातील एका मुलाची ही कथा असून त्याने पाहिलेल्या स्वप्नांविषयी जाणून घेता येणार आहे. त्याची इच्छा, आकांक्षा, दुःख, यश, अपयश हे सगळे तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळणार आहे.