समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यावर अनुपम खेर यांनी निशाणा साधला आहे. होय, तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? असा बोचरा सवाल अनुपम यांनी केला आहे.देशात इतके स्वातंत्र्य आहे की, इथे लष्करावर दगड भिरकावले जाऊ शकतात. हवाईदल प्रमुखाला शिव्याशाप दिल्या जाऊ शकतात. तुम्हाला एका देशात आणखी किती स्वातंत्र्य हवे? असे अनुपम खेर नसीरूद्दीन शहा यांना उद्देशून म्हणाले. तुम्हाला काहीही वाटू शकते. याचा अर्थ ते सगळे काही सत्य आहे, असा होत नाही, असेही अनुपम म्हणाले.
तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? नसीरूद्दीन शहांना अनुपम खेर यांचा बोचरा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 12:38 PM
समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यावर अनुपम खेर यांनी निशाणा साधला आहे. होय, तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? असा बोचरा सवाल अनुपम यांनी केला आहे.
ठळक मुद्दे काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीस अधिका-याची हत्या केली होती. त्या घटनेवर नसीरूद्दीन शहा यांनी भाष्य केले होते.