Join us

'थलायवा' सोबत राजपथावर चालताना दिसले अनुपम खेर, Video शेअर करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 16:59 IST

अनुपम खेर हे स्वत: रजनीकांत यांचे किती मोठे चाहते आहेत याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.

अभिनेते रजनीकांतचे चाहते कोण नाहीत. फक्त लोकच नाही कलाकारही त्यांचे प्रशंसक आहेत. रजनीकांत यांनी नुकतीच पंतप्रधानांच्या शपथविधीला हजेरी लावली. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. मुकेश अंबानी, शाहरुख खान, अक्षय कुमार, विक्रांत मेस्सी, अनुपम खेर यांचीही हजेरी होती. दरम्यान राजपथवर चालताना अनुपम खेर (Anupam Kher) यांनी रजनीकांत (Rajinikanth) यांच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे. 

अनुपम खेर हे स्वत: रजनीकांत यांचे किती मोठे चाहते आहेत याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. दिल्लीत पंतप्रधानांच्या शपथविधी कार्यक्रमाला जात असतानाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये ते रजनीकांत यांच्यासोबत चालत आहेत. अनुपम खेर म्हणतात, "वन अँड ओनल, मिस्टर रजनीकांत, द रजनीकांत. मानव जातीसाठी देवाने दिलेलं वरदानच. जय हो".

अनुपम खेर यांच्या या व्हिडिओवर अशोक पंडित कमेंट करत लिहितात, 'प्रतिष्ठा, प्रतिभा, माणूसकी, दयाळू आणि प्रेमाचे ते प्रतीक आहेत' अशा शब्दात त्यांनी रजनीकांत यांचं कौतुक केलं. अनुपम खेर यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. रजनीकांत आणि अनुपम खेर दोघांनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं. त्यांनी कायमच नरेंद्र मोदींनी पाठिंबा दर्शवला आहे.

टॅग्स :अनुपम खेररजनीकांतसोशल मीडियाबॉलिवूड