Join us

जेएनयू प्रकरणात अनुपम खेर यांची उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2016 7:14 AM

देशात घडणाºया गोष्टींमुळे भीती वाटते : व्यक्त केली भावना 

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रकरणावरू देशात राजकीय वातावरण तापले आहे. या राजकीय वादाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले आहेत. या गोष्टीवर नाराजी व्यक्त करत आपण भयभीत झालो असल्याची भावना बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केली.  ते म्हणाले, ‘‘जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे  हा वाद आता भाजपा आणि डावे पक्ष यांच्यातील वैचारिक मतभेदाचा भाग बनले आहे. एक भारतीय म्हणून या घटनेमुळे मला धक्का बसला आहे. वैयक्तिक मला खूप राग येतो आहे.काही मूठभर लोक देशाचे तुकडे करायला निघाले आहेत, यावर माझा विश्वासच बसत नाही. दोन पक्षांतील राजकीय वादापेक्षा या देशात अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की ज्याकडे लक्ष द्यायला हवे. मुनमुन घोष यांच्या ‘थिकर दॅन ब्लड’ या कादंबरीच्या प्रकाशना वेळी ते बोलत होते.‘‘काय सुरू आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात? जे काही व्हीडीओमध्ये आहे ते भीतीदायक आहे. भारतविरोधी घोषणांचा मला राग आला आहे. एक भारतीय म्हणून मला या गोष्टींचा राग येतो,’’ असेही खेर म्हणाले. घटनेने नागरिकांना भाषास्वातंत्र्य दिले असले तरी त्याचा अर्थ देशात दुफळी माजवणे असा होत नाही, असेही खेर शेवटी म्हणाले.