बॉलिवूडमधले लोकप्रिय अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे अनेक विषयांवर त्यांचं परखड मत मांडत असतात. अनुपम खेर लवकरच 'कागज 2' सिनेमातून भेटीला येणार आहेत. अनुपम खेर यांनी सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने मीडियाशी संवाद साधताना सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिलीय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करुन दुसऱ्यांच्या सुविधांना ठेच पोहचवू नये, असं अनुपम खेर म्हणाले. जाणून घेऊन सविस्तर.
अनुपम खेर म्हणाले, "मनोरंजन विश्वातील कलाकारांचं मत कोणीही गृहीत धरत नाही. मी अनेकदा न पटणाऱ्या गोष्टींसाठी आवाज उठवला आहे. मला भेडसावणाऱ्या अन्यायाविरोधात मी वाचा फोडली आहे. पण त्यामुळे अनेक लोकांची नाराजी मी ओढवून घेतलीय. मला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. दिवसाच्या अखेरीस मात्र मला शांत झोप लागते."
अनुपम खेर पुढे म्हणाले, "सर्वांना फिरण्याचं, बोलण्याचं, अभिव्यक्त होण्याचं स्वातंंत्र्य आहे. पण यामुळे तुम्ही दुसऱ्यांच्या सुविधांना हानी पोहचवू शकत नाही. परंतु सध्या आपल्या देशात अशाच गोष्टी घडत आहेत. मला वाटत नाही संपूर्ण भारतातला शेतकरी या आंदोलनाला पाठिंबा देत असेल. शेतकरी आपल्या देशाचा अन्नादाता आहे. परंतु मला वाटतं, सामान्य लोकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत करण्यात काही अर्थ नाही."