अभिनेत्री पायल घोष हिने केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप अडचणीत आला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अनेकजण अनुरागच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. अनुरागच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी कल्की कोच्लिन आणि आरती बजाज शिवाय अभिनेत्री तापसी पन्नू, राधिका आपटे, अमृता सुभाष, माही गिल अशा अनेकजणींनी अनुरागला पाठींबा दिला आहे. याचदरम्यान अनुरागवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणा-या पायल घोषचे एक ट्विट व्हायरल होतेय.पायलने 2018 मध्ये हे ट्विट केले होते. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटक-यांनी पायलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काय आहे हे ट्विटपायलने ऑक्टोबर 2018 मध्ये एक ट्विट केले होते. तिचे हेच ट्विट व्हायरल होतेय. ‘येथे (बॉलिवूडमध्ये) कोणीही रेप करत नाही. ते संधी साधण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तिथून निघून जा. इतका ड्रामा करण्याची गरज नाही,’ असे पायलने या ट्विटमध्ये लिहिले होते. या ट्विटचा स्क्रिनशॉट व्हायरल होताच पायलवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
त्याने मला भेटायला बोलावले आणि़....झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत पायलने अनुराग कश्यपवर गंभीर आरोप केलेत. अनुरागने काय काय केले, याबाबत तिने सविस्तर सांगितले.तिने सांगितले, ‘मी अनुरागला भेटायला त्याच्या यारी रोड इथल्या ऑफिसमध्ये गेली होती. दुस-या दिवशी त्याने मला फोन केला आणि बोलावले. काही ग्लॅमरस घालू नको जेणेकरून मी अभिनेत्री वाटेन असेही त्याने मला सांगितले. त्यावेळी त्याने माझ्यासाठी जेवण बनवले, जेवण झाल्यानंतर त्याने माझी जेवणाची प्लेटही उचलली. त्यानंतर मी तिथून निघून आले. त्याने मला पुन्हा मेसेज करून बोलावले. मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता म्हणून मी त्याला नकार दिला.यानंतर दोन-तीन दिवसांनी मी अनुरागला पुन्हा भेटले. त्याने मला घरी बोलावले. अनुरागने मला अडल्ट फिल्म दाखवली़ मी खूप घाबरले. यानंतर अचानक तो माझ्यासमोर न्यूड झाला आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी तिथून कसेबसे पळाले. त्यानंतर मी त्याला कधीच भेटले नाही. त्याने अनेकदा मला भेटायला बोलावले. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो.’
अनुरागची दुसरी एक्स वाइफ कल्कि आली त्याच्या सपोर्टसाठी समोर, म्हणाली - प्रिय अनुराग....
तू सर्वांत मोठा स्त्रीवादी...! तापसी पन्नू अनुराग कश्यपसाठी मैदानात उतरली अन् ट्रोल झाली म्हणून मी गप्प राहिली...त्या घटनेनंतर माझ्या काही मित्रांनी मला पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला. पण मी तक्रार केली नाही. मी खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला मात्र माझ्या कुटुंबाने आणि जवळच्या मित्रांनी मला गप्प राहायला सांगितले. त्यांना माझ्या भविष्याची चिंता होती, असेही पायल म्हणाली.