अनुराग कश्यप हा परखड बोलणारा दिग्दर्शक़ वास्तववादी चित्रपट बनवणाºया अनुरागच्या चित्रपटांचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. राजकारणापासून सामाजिक मुद्यांवर बेधडक मत मांडणारा अनुराग आपल्या या स्वभावामुळे अनेकदा ट्रोल होतो. पण अनेकदा ट्रोलर्स आपल्या सर्व मर्यादा ओलांडतांना दिसतात. सध्या एका ट्रोलरने अशाच सर्व मर्यादा लांघत अनुरागच्या मुलीला अतिशय अश्लिल भाषेत धमकी दिली आहे. दरम्यान या ट्रोलरने लिहिलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत, अनुरागने नरेंद्र मोदी यांचे याकडे लक्ष वेधले आहे. माझ्या मुलीला धमक्या देत तुमच्या विजयाचा आनंद साजरा करणा-या समर्थकांशी तुम्ही कसे निपटणार, प्लीज मला सांगा, असे ट्वीट अनुरागने केले आहे.
मुलीला मिळाली रेपची धमकी; अनुराग कश्यपने स्क्रिनशॉट शेअर करत, मोदींना केला हा सवाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 10:12 AM
राजकारणापासून सामाजिक मुद्यांवर बेधडक मत मांडणारा अनुराग आपल्या या स्वभावामुळे अनेकदा ट्रोल होतो. पण अनेकदा ट्रोलर्स सर्व मर्यादा ओलांडतांना दिसतात.
ठळक मुद्देतूर्तास अनुराग ‘सांड की आंख’ हा चित्रपट प्रोड्यूस करतो आहे.