बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगनाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगते. रोज कंगना कोणाशी तरी पंगा घेते आणि चर्चेत राहते. सुशांतच्या मृत्युला बॉलिवूडमधील घराणेशाही, गटाबाजी जबाबदार असल्याचे सांगत तिने संपूर्ण बॉलिवूडवरच आरोप केले. त्यानंतर आता तिने थेट अनुराग कश्यपसह पंगा घेतला आहे. सध्या यांच्यात चांगलेच वाद रंगत आहेत. रोज कंगना आणि अनुराग एकमेकांबद्दल वेगवेगळे खुलासे करत आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
कंगनाने 'क्वीन' सिनेमाच्या शूटिंगवेळी तिला जबदरस्तीने ड्रग्स दिल्याचे सांगितले होते. यावर अनुरागनेही सांगितले की, कोणीही कोणाला कसल्याही कामासाठी जबरदस्ती करत नाही. आपल्याला काय करायचे आहे हे स्वतःला ठरवायचे असते. चांगला अभिनय करता यावा या दडपणाखाली कंगना स्वतःहून शँपेन प्यायची.असे केल्याने तिचाआत्मविश्वास वाढेल असा तिचा समज असल्याचे अनुरागने खुलासा केला होता.
अभिनेत्री पायल घोष हिने लावलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे अनुराग कश्यप चर्चेत आहे.पायलने ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. ओशिवरा पोलीस आता पायलचा जबाब नोंदवत असल्याची माहिती तिचे वकील नितीन सातपुते यांनी दिली. कश्यप यांनी एकदा तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभिनेत्री घोष यांनी केला आहे. कश्यप तिच्यासमोर नग्न असल्याचा दावा घोषने केला असल्याची माहिती दैनिक भास्करने दिली होती.
अनुरागवरील या आरोपांनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्याच्या सपोर्टसाठी समोर आले आहेत. तापसी पन्नूने सर्वात आधी त्याच्या सपोर्टमध्ये पोस्ट केली होती. अनुराग हा सर्वात मोठा फेमिनिस्ट असल्याचं तापसी म्हणाली होती. आता तर तापसी म्हणाली की, अनुराग महिलांचा खूप सन्मान करतो आणि तरी सुद्धा तो लैंगिक शोषणात दोषी आढळला तर ती त्याच्यासोबतचे सगळे संबंध तोडेन. तापसी मुंबई मिररसोबत बोलताना सांगितले की, अनुराग कधीही कोणत्याही व्यक्तीबाबत वाईट बोलला नाही. तापसी म्हणाली की, अनुरागच्या सेट्सवर अनेक महिला पुरूषांच्या बरोबरीने काम करतात जे इतर ठिकाणी फार कमी बघायलं मिळतं. ती म्हणाली की, जर एखाद्या व्यक्तीचं शोषण झालं असेल तर प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, जे सत्य असेल ते समोर येईल.
अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने अनुरागवर लैंगिक गैरतर्वनाचा आरोप करणा-या पायल घोषच्या नावे एक खुले पत्र लिहिले आहे. अनुराग खरोखर दोषी असेल तर कायद्यानुसार त्याला शिक्षा होईल. मात्र मीटूच्या नावावर खोटे आरोप या मोहिमेची धार नक्कीच कमी करतील, असे राजश्रीने म्हटले आहे. राजश्री देशपांडेने अनुरागसोबत ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘चोक्ड’मध्ये काम केले आहे. राजश्रीने अनुरागला पाठींबा देत एकपाठोपाठ एक अनेक ट्विट केलेत़.