सध्या वेबसीरिजचा जमाना आहे़ लॉकडाऊनच्या काळात तर वेबसीरिजनी नुसती धूम केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मपासून तर सोशल मीडियापर्यंत अनेक वेबसीरिजची जोरदार चर्चा आहे. अॅमेझॉन प्राइमवर नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पाताल लोक’ या वेबसीरिजने म्हणायला अनेक वाद ओढवून घेतले. पण ‘पाताल लोक’ लोकांच्या उड्या पडल्यात. सीरिजमधील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचे कौतुक झाले. यापैकीच एक म्हणजे अभिषेक बॅनर्जी.गेल्या काही दिवसांपासून ‘पाताल लोक’मध्ये हाथीरामची भूमिका साकारणारा जयदीप अहलावत आणि अभिषेक बॅनर्जीच्या अॅक्टिंगची जोरदार प्रशंसा होत आहे. बॉलिवूडच्याही अनेकांनी ‘पाताल लोक’च्या ‘हि-यांची’ची प्रशंसा केली आहे. दिग्दर्शक व अभिनेता अनुराग कश्यप तर अभिषेक बॅनर्जीचा फॅन बनला आहे.
अनुरागने अभिषेकचे कौतुक करणारे एक ट्विट रिट्विट केले आहे. हे ट्विट रिट्विट करताना अनुरागने लिहिले,‘ 2006 मध्ये असा होता. 2020 मध्ये मोठा होऊन हथौडा त्यागी बनला. 14 वर्षांच्या या प्रवासात गाडी कोणकोणत्या स्टेशनवर थांबली, कुणाला ठाऊकही नसेल.’
‘पाताल लोक’मध्ये अभिषेकने विशाल त्यागी उर्फ हथौडा त्यागीचे पात्र साकारले आहे. हातोड्याने खून करतो म्हणून त्याचे नाव ‘हथौडा त्यागी’ दाखवले आहे. त्याच्यावर 45 हत्या, अपहरण, खंडणी असे गुन्हे असतात. तसा तर ‘हथौडा त्यागी’ सीरिजचा विलन आहे. पण सीरिज संपता संपता हाच ‘हथौडा त्यागी’ खरा हिरो असल्याचे आपल्याला कळते.
‘पाताल लोक’ आधी अभिषेक आयुषमान खुराणाच्या ‘ड्रिम गर्ल’ व राजकुमार रावसोबत ‘स्त्री’मध्ये दिसला होता. अभिषेक हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहे. वयाच्या चाळीशीनंतर अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचे खरे तर अभिषेकने ठरवले होते. पण आमिर खानच्या सिनेमातून त्याचा डेब्यू झाला. हा सिनेमा कुठला तर ‘रंग दे बसंती’.