अभिनेत्री पायल घोष हिने अलीकडे दिग्दर्शक व अभिनेता अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केलेत. यानंतर काल मुंबई पोलिसांनी अनुरागची तब्बल 8 तास चौकशी केली. आता अनुरागच्या वकील प्रियंका खिमानी यांनी या प्रकरणासंदर्भात एक स्टेटमेंट जारी केले आहे. पायल घोषने अनुरागवर केलेले सर्व आरोप या स्टेटमेंटमध्ये फेटाळून लावण्यात आले आहेत.
काय म्हणाली होती पायल घोषअभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे.झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत पायलने अनुराग कश्यपने तिच्यासोबत काय काय केले, ते सविस्तर सांगितले होते. तिने सांगितले की, ‘अनुरागने मला घरी बोलावले होते. तो स्मोकिंग करत होता. काही वेळानंतर त्याने मला दुस-या खोलीत नेले. त्यानंतर त्याने मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक तो माझ्यासमोर न्यूड झाला आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्याला मला कन्फर्टेबल वाटत नाही, असे म्हणाले. यावर मी ज्या अभिनेत्रींसह काम केले आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे अनुराग मला म्हणाला. मी तिथून कसेबसे पळाले. त्यानंतर मी त्याला कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावलं. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो.
'छताला लटकलेली दिसेन, पण ती माझी आत्महत्या नसेल'; पायल घोषचं खळबळजनक विधान
अभिनेत्री बलात्कार प्रकरण : अनुराग कश्यप यांची आठ तास चौकशी
अनुरागने नाकारले होते आरोपअनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत पायल घोषच्या आरोपांना उत्तर दिले होते. थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले होते.हा सगळा मला फसवण्याचा कट असल्याचा दावा अनुरागने केला होता.क्या बात है, मला चूप करण्यासाठी इतका वेळ घेतला. काही हरकत नाही. पण मला चूप करण्यासाठी इतके खोटे बोललात की, दुस-या महिलांनाही यात ओढले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम. मी फक्त एवढेच म्हणेल की, जे काही आरोप आहेत ते सगळे निराधार आहेत, असे ट्विट अनुरागने त्याने केले होते.