अनुराग कश्यप आहे ‘या’ सुपरस्टारच्या प्रेमात! म्हणे, त्याच्यासोबत चित्रपट केल्याशिवाय मी बॉलिवूड सोडणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 5:11 AM
एखाद्या विशिष्ट अभिनेत्यासोबत चित्रपट बनविण्याचे एखाद्या दिग्दर्शकाचे स्वप्न असू शकते? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थीचं द्यावे लागेल. किमान दिग्दर्शकअनुराग कश्यप ...
एखाद्या विशिष्ट अभिनेत्यासोबत चित्रपट बनविण्याचे एखाद्या दिग्दर्शकाचे स्वप्न असू शकते? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थीचं द्यावे लागेल. किमान दिग्दर्शकअनुराग कश्यप याच्याबद्दल तरी असेच आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील एका अभिनेत्यासोबत चित्रपट बनवण्याचे अनुरागचे स्वप्न आहे. या अभिनेत्यासोबत चित्रपट बनवल्याशिावाय मी इंडस्ट्रीला अलविदा म्हणूच शकत नाही, असे अनुराग म्हणतोय. आता हा अभिनेता कोण? हे जाणून घेण्याची तुमची उत्सुकता ताणली असेल. तर या अभिनेत्याचे नाव आहे, शाहरूख खान. होय, किंगखान शाहरूख खान याच्यासोबत एक तरी चित्रपट बनवणे, हे स्वप्न अनुराग उराशी बाळगून आहे. अलीकडे एका मुलाखतीत अनुरागने याबद्दल सांगितले. ‘शाहरूख व मी ‘नो स्मोकिंग’मध्ये एकत्र काम करणार होतो. पण काही कारणामुळे हे शक्य झाले नाही आणि हा चित्रपट जॉन अब्राहमच्या झोळीत पडला. शाहरूख व मी अद्याप एकही चित्रपट केलेला नाही. पण आम्ही निश्चितपणे एकत्र चित्रपट करू. त्याच्यासोबत चित्रपट बनवत नाही, तोपर्यंत मी बॉलिवूडमधून जाणार नाही. मी त्याच्यासाठी एक अशी कथा लिहिल, जी त्याला नक्की आवडेल, ’असे अनुराग म्हणाला. ALSO READ : १७ वर्षांची झाली आलिया; तिच्यापेक्षा केवळ सात वर्षांनी मोठी आहे डॅडी अनुराग कश्यपची गर्लफ्रेंड!‘शाहरूख मला विद्यापीठात असतानापासून सीनिअर आहे. त्याने कायम मोठ्या भावासारखी मला मदत केली आहे. शाहरूख ही एकमेव अशी व्यक्ति आहे, जिच्यासमोर मी मोठ्या आवाजात बोलू शकत नाही. तो माझ्यावर ओरडला तर मी एक शब्दही न बोलता एखाद्या कोपºयात बसून रडत बसेल. त्याला प्रतित्त्युर देण्याची कल्पनाही मी करू शकत नाही. मी त्याचा प्रचंड आदर करतो,’ असेही अनुराग म्हणाला.खरे तर अनुराग व शाहरूख हे एकमेकांना परस्पर विसंगत आहेत. त्या दोघांच्या चित्रपटांची निवडही अशीच एकमेकांना विसंगत आहे. त्यामुळे अनुरागच्या चित्रपटात शाहरूख, ही कल्पनाच अनेकांना पचनी पडत नाही पण कदाचित अनुराग ही कल्पना सगळ्यांच्या गळी उतरवणार, असेच दिसतेय. त्याचे इरादे तरी हेच सांगणारे आहेत. निश्चिपणे असे झाले तर अनुराग व शाहरूखला एकत्र पाहणे इंटरेस्टिंग असेल, हे वेगळे सांगणे नकोच.