अभिनेत्री पायल घोष हिने बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली. माझ्या सुरक्षेस धोका असल्याचे पायलने म्हटले. अनुराग कश्यपने या आरोपानंतर प्रतिक्रिया दिली आहे. अनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत या आरोपांना उत्तर दिले़.थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले.
पहिले ट्विट
क्या बात है, मला चूप करण्यासाठी इतका वेळ घेतला. काही हरकत नाही. पण मला चूप करण्यासाठी इतके खोटे बोललात की, दुस-या महिलांनाही यात ओढले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम. मी फक्त एवढेच म्हणेल की, जे काही आरोप आहेत ते सगळे निराधार आहेत, असे पहिले ट्विट अनुरागने केले.
दुसरे ट्विटदुस-या ट्विटमध्ये तो म्हणाला, मॅडम दोन लग्न केलीत. तो गुन्हा आहे तर मान्य आहे. प्रेमही खूप केले, तेही मान्य करतो. मग माझी पहिली पत्नी असो, दुसरी पत्नी असो वा प्रेयसी किंवा मग त्या सर्व अभिनेत्री, ज्यांच्यासोबत मी काम केले. माझ्यासोबत काम करणारी मुलींची वा महिलांची संपूर्ण टीम शिवाय ज्या महिलांना मी फक्त भेटलो, सर्वांवर मी प्रेम केले. एकांतात वा सर्वांसमोर.
तिसरे ट्विटतुम्ही म्हणता तसे मी ना वागतो, ना सहन करतो. बाकी सगळे पाहतातच़ तुमच्या व्हिडीओमध्येही किती सत्य आहे, ते दिसतेच. बाकी तुम्हाला केवळ प्रेम आणि आशीर्वाद. तुमच्या इंग्रजी प्रश्नाचे उत्तर हिंदीत देण्याबद्दल माफी.
चौथे ट्विटचौथ्या ट्विटमध्ये तो म्हणतो, आता तर आणखी खूप आक्रमणं व्हायची आहेत. ही तर सुरूवात आहे. खूप फोन आलेत. काहीही बोलू नकोस आणि शांत बस. हे सुद्धा ठाऊक नाही की बाण कुठून कुठून सोडले जातील. फक्त प्रतीक्षा करतोय.
अनुराग कश्यपवर अभिनेत्रीकडून लैंगिक शोषणाचा आरोप; पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत
अनुराग-कंगनात पेटलं ट्विटर वॉर, म्हणाली - इतका मंदबुद्धी कधीपासून झालास... अभिनेत्री पायल घोषचे आरोप
‘अनुराग कश्यप याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. नरेंद्र मोदीजी, कृपया कारवाई करा. या सर्जनशील व्यक्तिमागील राक्षण देशाला पाहू दे. यामुळे माझे नुकसान होऊ शकते, याची मला कल्पना आहे. माझ्या सुरक्षेला धोका आहे. कृपया मदत करा,’असे ट्विट पायलने केले होते.राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पायलच्या या ट्विटची दखल घेतली आहे. पायलने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करावी, असे रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.
कंगनाने केली अटकेची मागणीअभिनेत्री कंगना राणौतने पल्लवी घोषचे ट्विट रिट्विट केले होते. ‘प्रत्येकाने उठवलेला आवाज महत्त्वाचा आहे. अनुराग कश्यपला अटक व्हायला हवी,’ असे कंगनाने म्हटले होते.