प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप हा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवण्यासाठी ओळखला जातो. त्याचे चित्रपट, सामाजिक मुद्यांवर कायमच भाष्य करत असतात. दिग्दर्शक म्हणून अनुरागचा एक मोठा चाहतावर्ग आहे. तो सहजासहजी कुणाचं कौतुक करत नाही. पण, आता त्याने थेट एका स्टार किडच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. एवढंच काय तर स्टार किडचा सिनेमा पाहण्याचा सल्लाही त्याने दिलाय.
अनुराग कश्यपने ज्या स्टार किडचं कौतुक केलं आहे, ती आहे अभिनेत्री अन्यया पांडे. नुकतंच अनन्याचा CTRL हा चित्रपटOTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झालाा आहे. विक्रमादित्य मोटवणे दिग्दर्शि या सिनेमात तिने नेला अवस्थीची भूमिका साकारली आहे. CTRL हा सिनेमाचं, दिग्दर्शकाचं आणि अनन्याच्या अभिनयाचं अनुराग कश्यपने कौतुक केलं आहे. त्याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अनुराग कश्यपने लिहलं, "विक्रमादित्य मोटवानी आणखी एक धमाकेदार चित्रपट घेऊन आला आहे. तंत्रज्ञान आणि कथाकथनाच्या बाबतीत पुन्हा त्याने एक पाऊल पुढे टाकलं आहे. तुम्ही त्या माणसावर नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा त्याला एका चौकटीत बसवू शकत नाही. त्याच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीपेक्षा तो धाडसी आहे. तो नेहमीच प्रत्येकाच्या एक पाऊल पुढे असतो. त्याची ही थ्रिलर कथा धडकी भरवणारी आहे. या सिनेमात अनन्या पांडेने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनय केला आहे".
'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून फिल्मी दुनियेत प्रवेश करणारी अनन्या पांडे अलीकडेच 'कॉल मी बे' या वेब सीरिजमध्ये दिसली. ही तिची पहिलीच सीरिज होती. आता ती Ctrl या चित्रपटात पाहायला मिळतेय. कधी काळी आपल्या अभिनयामुळे ट्रोल होणारी अनन्या पांडे आता हळूहळू पुढे जात आहे. मोठ्या पडद्यापासून ते OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिजच्या माध्यमातून स्वत:ची एक नवीन ओळख निर्माण करत आहे.