देशाचं नाव भारत करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकार हा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कलाविश्वातील सेलिब्रिटींकडूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. आता बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने यावर त्यांचं मत मांडलं आहे.
एका मुलाखतीत भारत की इंडिया वादावर त्यांना प्रश्न विचारतत तो म्हणाला, "इंडिया भारत कधी नव्हता? मला हे समजतच नाही. फक्त काही कागदपत्रांवर इंडियाऐवजी भारत लिहिलं जाणार आहे. पण, शासकीय कागदपत्रांवरील नाव बदललं जाईल. प्रत्येकाला पासपोर्ट, आधार कार्ड, रेशन कार्डमध्ये बदल करावा लागणार आहे. चार वर्षांच्या कराइतके पैसे फक्त या गोष्टीवर खर्च होणार आहेत."
अमित शाहांच्या ट्विटवर प्रकाश राज खोचक बोलले, कंगना रणौत भडकली अन् म्हणाली...
'जवान'साठी घेतलेल्या मानधनाबाबत दीपिका पदुकोणचा मोठा खुलासा, म्हणाली, "मी या चित्रपटासाठी..."
"सगळं काही बदलावं लागणार आहे. एक लहरी माणूस त्याला इच्छा झाली म्हणून असं करत आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार त्याने केलेला नाही. सगळ्या बँक नोटा, शैक्षणिक कागदपत्रे, लस प्रमाणपत्र सगळ्यामध्ये बदल करावे लागतील. या सगळ्याची ते पुन्हा छपाई करणार आहेत का? हे सगळं होईपर्यंत लोकांनी थांबून राहायचं का? लोकांना राशन मिळणार नाही. त्यांना प्रवास करता येणार नाही. ते कोणत्या जगात राहत आहेत?", असंही पुढे अनुराग कश्यप म्हणाला.