Join us

'कास्टिंग काउच करून रोल मिळवण्यासाठी आलेल्या अभिनेत्रीवर भडकला होता अनुराग'

By अमित इंगोले | Published: September 23, 2020 1:54 PM

जयदीपने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, तो 'गुलाल' सिनेमासाठी सेकंडरी कास्टिंह बघत होता. तेव्हा एका अभिनेत्री अनुरागला भेटण्यासाठी आली होती.

बॉलिवूडमधील दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषणे लैंगिक शोषणाचा आरोप लावलाय. पायल आपल्या आरोप म्हणाली की, २०१५ मध्ये अनुराग कश्यपने तिला घरी बोलवून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. अनुरागवर हा आरोप लावण्यात आल्यावर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्याच्या सपोर्टमध्ये समोर आले आहेत. यात त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. २००४मध्ये अनुरागचा असिस्टंट राहिलेल्या जयदीप सरकारन काही ट्विट्स करून अनुरागला सपोर्ट केलाय. 

जयदीपने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, तो 'गुलाल' सिनेमासाठी सेकंडरी कास्टिंह बघत होता. तेव्हा एका अभिनेत्री अनुरागला भेटण्यासाठी आली होती. काही वेळ वाट पाहिल्यावर अनुराग तिला भेटण्यासाठी तयार झाला. पण त्या अभिनेत्रीला वाटलं होतं की, 'कास्टिंग काउच'च्या माध्यमातून ती सिनेमात काम मिळवू शकले आणि त्यानुसार तिने अनुराग काही 'फेवर' ऑफर केले होते.

जयदीपने आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, अुनरागने  अभिनेत्रीची ऑफर इग्नोर गेली होती. त्यानंतर अभिनेत्रीने अनेकदा तिच्या साडीचा पदर खाली पाडला होता. ज्यावर अनुरागने तिला असं करण्यान मनाई केली होती. अनुराग तेव्हा अभिनेत्रीला म्हणाला होता की, जर ती रोलसाठी फिट असेल तरच तिला रोल मिळेल. दुसरं काही करून रोल मिळणार नाही. यानंतर अनुराग रागातच त्या रूममधून बाहेर गेला होता. अनुराग नंतर निराश होऊन जयदीपला म्हणाला होता की, त्याला याचं वाईट वाटतं की, काही महिला असा विचार करतात की, काम मिळवण्याची ही एकच पद्धत आहे.

 

जयदीपने त्याच्या पुढील ट्विटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय की, अनुराग कश्यप महिलांचा सन्मान करतो. तो म्हणाला की, तो हे म्हणू शकतो कारण त्याने अनुराग कश्यपसोबत कास्टिंग डिपार्टमेंटमध्ये काम केलं आहे.

तापसी पन्नू म्हणाली - 'जर अनुराग कश्यप लैंगिक अत्याचारात दोषी आढळला तर....'

अनुराग दोषी असेल तर...; राजश्री देशपांडेने पायल घोषला लिहिले खुले पत्र

अनुराग कश्यपवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत हुमा कुरेशीने केली पोस्ट, म्हणाली -

टॅग्स :अनुराग कश्यपबॉलिवूड