Join us

अनुष्का-विराट लंडनमध्येच देणार दुसऱ्या बाळाला जन्म? प्रसिद्ध उद्योगपतींचं ट्वीट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 12:23 IST

आता अनुष्का आणि विराट लंडनमध्ये त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याचंही बोललं जात आहे. याबाबत प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोएंका यांनी एक ट्वीट केलं आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनुष्का आणि विराट कोहली हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. विरुष्का पुन्हा आईबाबा होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. पण, याबाबत अद्याप विरुष्काकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. अशातच आता अनुष्का आणि विराट लंडनमध्ये त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याचंही बोललं जात आहे. याबाबत प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोएंका यांनी एक ट्वीट केलं आहे. 

हर्ष गोएंका यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं आहे. "पुढच्या काही दिवसांत नवीन बाळ जन्म घेणार आहे. क्रिकेटर वडिलांप्रमाणेच त्यांचं बाळही भारताला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, अशी आशा आहे. की आईच्या पावलावर पाऊल ठेवत फिल्मस्टार होईल?", असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. याबरोबरच त्यांनी मेड इन इंडिया आणि #tobeborninlondon हे हॅशटॅगही वापरले आहेत. त्यांनी ही पोस्ट विरुष्काबद्दल केली असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या या पोस्टवरुन अनुष्का आणि विराट त्यांच्या दुसऱ्या बाळाला लंडनमध्येच जन्म देणार असल्याच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. 

अनुष्का आणि विराटने २०१७ साली विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. २०२१मध्ये विरुष्काची लेक वामिका हिचा जन्म झाला. अद्याप अनुष्का आणि विराटने लेकीचा चेहरा दाखवलेला नाही. ते कॅमेऱ्यापासून तिला दूरच ठेवणं पसंत करतात.  

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीऑफ द फिल्ड