Join us

​वर्षभरात इतके कोटी कमावतात अनुष्का शर्मा अन् विराट कोहली ! लग्नानंतर इतकी असेल विरूष्काची संपत्ती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 9:05 AM

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. चर्चा खरी मानाल ...

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. चर्चा खरी मानाल तर येत्या १२ ते १५ डिसेंबरदरम्यान विराट व अनुष्का लग्नबंधनात अडकू शकतात. इटलीत हे लग्न होणार, असेही बोलले जात आहे.  या लग्नासाठी अनुष्का व विराट दोघेही इटलीला रवाना झाले आहेत. लग्नाची खबर खरी ठरलीच तर अनुष्का अन् विराटची जोडी ख-या अर्थाने विरूष्का म्हणून ओळखली जाईल. लग्नानंतर या दोघांचे आयुष्य  किती बदलेल, हे आम्हाला ठाऊक नाही पण एक खास माहिती मात्र आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ शकतो. होय, ही खास माहिती आहे, विरूष्काच्या संपत्तीबद्दलची. सध्या अनुष्का व विराटची संपत्ती किती आहे आणि लग्नानंतर या जोडीची एकत्रित संपत्ती किती असणार, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. finapp.co.in  या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर विराट व अनुष्काचे वार्षिक उत्पन्न ६१० कोटी रूपयांपर्यंत जाईल. या संकेतस्थळानुसार, विराटचे वार्षिक उत्पन्न ३९० कोटी रुपए आहे. एका वनडे मॅचचे विराटला तीन लाख रुपए मिळतात. तर टेस्ट मॅचसाठी पाच लाख. त्याच्या दोन्ही सीझनचे उत्पन्न सुमारे १४ कोटींच्या घरात आहे. जाहिराती आणि प्रॉपर्टीची किंमत पकडून ही रक्कम ४२ कोटींच्या घरात जाते. त्याची १८ कोटींची खासगी गुंतवणूकही आहे. त्याच्याकडे ६ लग्झरी गाड्या आहेत. त्याची एकूण किंमत ९ कोटी रुपए आहे.ALSO READ : अनुष्का शर्मा व विराट कोहलीची लगीनघाई! हा घ्या पुरावा!!अनुष्काचे म्हणाल तर अनुष्का एका चित्रपटासाठी सुमारे ५ कोटी फी घेते. सोबतच जाहिरातींमधून सुमारे ४ कोटी रुपए कमावते. वार्षिक ३६ कोटींची गुंतवणूक असलेल्या अनुष्काकडे चार लग्झरी गाड्या आहे. त्यांची किंमत ५ कोटींच्या घरात आहे. अलीकडे अनुष्काने तिची क्लोदिंग लाईन ‘नुश’ लॉन्च केली आहे. संकेतस्थळाचे मानाल तर अनुष्काकडे एकूण २२० कोटींची संपत्ती आहे.