अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यावर्षी दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. अनुष्काने फेब्रुवारीमध्ये एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव तिने अकाय (Akaay) ठेवले आहे. अनुष्का आणि विराटने आपल्या दोन्ही मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. अनुष्का शर्माने आपल्या मुलाचे नाव अकाय जाहीर करताच सोशल मीडिया अकायमय झाले होते. त्यानंतर सर्वजण अकाय या शब्दाचा अर्थ शोधू लागले होते.
अनुष्काचा मुलगा अकायच्या नावाचा अर्थ गुगलवर इतका शोधला गेला की त्याने २०२४ या वर्षासाठी गुगलच्या सर्चमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. अकाय नावाचा अर्थ हे सर्च गुगलवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिपोर्ट्सनुसार, अकाय हा तुर्की मूळचा हिंदी शब्द आहे. हा शब्द कायापासून बनला आहे - ज्याचा अर्थ शरीर आहे. संस्कृतमध्ये, अकाय म्हणजे 'कोणतीही गोष्ट किंवा अशी वस्तू म्हणजे शरीराशिवायचं रुप.
विरुष्का आहेत दोन मुलांचे पालक२०१३ साली एका टीव्ही जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान अनुष्का आणि विराटची भेट झाली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवले होते पण त्यांनी आपले नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते. या जोडप्याने २०१७ मध्ये लग्न केले. अनुष्का आणि विराटचे इटलीत लग्न झाले होते. त्यानंतर, २०२१ मध्ये हे जोडपे पहिल्यांदा पालक झाले. त्यांनी आपल्या मुलीचे नाव वामिका ठेवले. फेब्रुवारीमध्ये मुलगा अकायच्या जन्मानंतर अनुष्का आणि विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिले होते की, अपार आनंदाने आणि प्रेमाने भरलेल्या अंत:करणाने, सर्वांना सांगायला आनंद होत आहे की १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या लहान मुलाचे अकाय आणि वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले!