‘आॅस्कर’ नव्हे तर चंद्रावरही नील आर्मस्ट्रॉँगसोबत पोहचली अनुष्का शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2017 3:57 PM
२० जुलै १९६९ मध्ये जेव्हा नील आर्मस्ट्रॉँग चंद्रावर पोहचले होते, तेव्हा ‘फिल्लोरी’ची शशी अर्थात अनुष्का शर्मा हिने त्यांना चंद्रावर ...
२० जुलै १९६९ मध्ये जेव्हा नील आर्मस्ट्रॉँग चंद्रावर पोहचले होते, तेव्हा ‘फिल्लोरी’ची शशी अर्थात अनुष्का शर्मा हिने त्यांना चंद्रावर पाऊल ठेवण्यास मदत केली होती. आश्चर्य वाटले ना, पण असाच काहीसा प्रचार सध्या अनुष्का शर्मा करीत आहे. तिच्या आगामी ‘फिल्लोरी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती वेगवेगळे फंडे वापरीत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आॅस्कर सोहळ्यात सहभागी झाल्याचा एक एडिट फोटो शेअर केला होता. आता तर तिने हद्दच केली. चक्क नील आर्मस्ट्रॉँगसोबत चंद्रावर पोहचलेला एक एडिट फोटो शेअर केला आहे. व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून फॅन्सला जुळल्यानंतर अनुष्का जगभरातील ऐतिहासिक घटनांच्या फोटोमध्ये स्वत:ला एडिट करून मिरवित आहे. अर्थात सिनेमातील शशी नावाची मुलगी त्याठिकाणी पोहचत असल्याचे दाखविले जात असल्याने तिचा हा प्रमोशन फंडा चांगलाच हिट ठरत आहे. यावेळेस तर तिने चक्क नील आर्मस्ट्रॉँगसोबत तिचा फोटो एडिट करून शेअर केला आहे. फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘यांना चंद्रावर झेंडा लावण्यासाठी मीच मदत केली होती. मला आॅक्सिजन मास्क आणि स्पेससूटची अजिबात गरज भासली नाही. मी चंद्रावरही कम्फर्टेबल होती. या एडिट फोटोमध्ये शशी नील आर्मस्ट्रॉँग आणि झेंडा यांच्यामध्ये बघावयास मिळत आहे. या अगोदर अनुष्काने आॅस्कर सोहळ्यातला एक एडिट फोटो शेअर केला होता. जेव्हा ‘ला ला लॅण्ड’ आणि ‘मूनलाइट’ या सिनेमाच्या नावाच्या घोषणेवरून गोंधळ झाला होता तेव्हा अनुष्का म्हणजेच शशी तिथे उपस्थित होती. या फोटो कॅप्शनमध्ये अनुष्काने म्हटले होते की, ‘या लोकांपर्यंत माझा आवाज पोहचत नाही, केव्हापासून मी यांना हिंदीमध्ये सांगत आहे की, हे नाव चुकीचे आहे.’ निर्माता म्हणून ‘फिल्लोरी’ हा अनुष्काचा दुसरा सिनेमा आहे. या अगोदर तिने ‘एनएच-१०’ ची निर्मिती केलेली आहे. सिनेमात अनुष्का शशी नावाच्या एका घोस्ट ब्राइडची भूमिका साकारत आहे. जिची चुकीने एका मांगलिक मुलाशी (सूरज शर्मा) विवाह होतो. कथेत एक फ्लॅशबॅक असून, ज्यामध्ये अनुष्का आणि दिलजीत दोसांझ यांची प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. अंशई लाल यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा येत्या २४ मार्च रोजी रिलीज होणार आहे.