Join us

Happy Birthday Anushka sharma : विरूष्काने कुटुंबापासून लपवले होते प्रेम, हे होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 10:39 AM

अनुष्का शमार्चा आज वाढदिवस...

ठळक मुद्देलग्नानंतर अनुष्काने तिच्या सीक्रेट वेडिंगबद्दल खुलासा केला होता. 

अनुष्का शर्माचा आज (1 मे)वाढदिवस. ‘रब दे बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे अनुष्काने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिचा पहिला चित्रपट हिट झाला. त्यानंतर अनुष्काने कधीच मागे वळून पाहिले नाही. बँड बाजा बरात, जब तक है जान, पीके, सुल्तान, संजू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली.  मॉडलिंग किंवा पत्रकारिता यापैकी एका क्षेत्रात अनुष्काला करिअर करायचे होते. तिने मॉडेलिंगला पसंती दिली आणि मॉडलिंग करण्यासाठी ती मुंबईत आली. पुढे मॉडेलिंग करता करता तिला काही जाहिरातीत काम मिळाले आणि नंतर अनेक संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. पण आज आम्ही अनुष्काच्या करिअरबद्दल नाही तर तिच्या सीक्रेट लव्हस्टोरीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. 

होय, अनुष्का आणि विराटने आपले प्रेमही अनेक वर्षं जगापासून लपवून ठेवले होते. असे म्हणतात की, लग्नाआधी सुमारे चार वर्षं विरूष्का एकमेकांना डेट करत होते. पण तसे नाही. अनुष्का व विराट अगदी लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. कदाचित तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

  डिसेंबर २०१७ मध्ये अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. या सीक्रेट मॅरेजची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. अनुष्का व विराटची लव्हस्टोरी सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण एक गोष्ट कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. होय, अनुष्का व विराट दोघेही बालपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. पुढे विरूष्का लग्नबंधनात अडकल्यानंतर  अनुष्काची आजी उर्मिला यांनी हे गुपित उघड केले होते.

उर्मिला यांनी सांगितले होते की, आमच्या कुटुंबातील आम्ही सगळेच विराटला आधीपासून ओळखत होतो. तो लहान असताना अनेकदा आमच्या घरी येत असे. तेव्हा अनुष्का व विराट दोघेही क्रिकेट खेळत. अनुष्काचे वडील सैन्यात असल्याने आम्ही बंगळुरूला राहत होतो. त्यावेळी अनुष्काचा भाऊ कर्णेश क्रिकेट खेळायचा. विराट सुद्धा त्यावेळी त्याच्या टीममध्ये होता. त्यामुळे अनेकदा विराट त्याच्यासोबत आमच्या घरी येत असे. जेव्हा मी माझ्या मुलाला आणि नातवंडांना भेटायला बंगळुरूला जात असे तेव्हा मी अनेकदा विराटला भेटले होते. विराट मला आधीपासूनच खूप आवडायचा. कदाचित विराट व अनुष्का तेव्हापासूनच प्रेमात होते. पण दोघांनीही कुटुंबापासून हे लपवून ठेवले होते.

लग्नानंतर अनुष्काने तिच्या सीक्रेट वेडिंगबद्दल खुलासा केला होता. ‘वोग’ या जगप्रसिद्ध मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने सांगितले होते की, आम्हाला एक कौटुंबिक विवाह सोहळा हवा होता. आमच्या लग्नात केवळ ४२ पाहुणे होते. केवळ आमचे कुटुंबीय आणि अतिशय जवळचे मित्र. मला सेलिब्रिटी वेडिंग नको हवे होते. त्यामुळेच आम्ही सीक्रेट वेडिंगचा बेत आखला. हे वेडिंग इतके सीक्रेट होते की, केटररला आम्ही आमची खोटी नावे सांगितली होती. मला आठवते, विराटने त्याचे नाव राहुल सांगितले होते.

 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली