Join us

 विरुष्काने एअरपोर्टवर वामिकाला 'लपवलं'; 'तो' फोटो पाहून नेटकऱ्यांनी अनुष्काला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 16:47 IST

आई-बाबासोबत चिमुकली वामिका  पण चेहरा दिसेना...! सोशल मीडियावर पुन्हा एकदा विरूष्काच्या लेकीची चर्चा 

ठळक मुद्देयावर्षी 11 जानेवारीला अनुष्का आई झाली. परंतु, मुलीच्या जन्मानंतरच विराट आणि अनुष्काने सर्व माध्यमातील व्यक्ती आणि कॅमेरामन इत्यादींना पत्र पाठवून आपल्या मुलीचे फोटो क्लिक करू नयेत, अशी विनंती केली होती.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) व विराट कोहलीची लाडकी लेक वामिकाची (Vamika) एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत. पण लोकांना वामिकाचा चेहराच काय पण नखही दिसू नये, यासाठी विरूष्काचा आटापिटा सुरू आहे.  अनुष्का तर याबाबतीत मुलीचा चेहरा दिसू नये, यासाठी पुरेपूर प्रयत्न करतेय. . बुधवारी रात्री अनुष्का व विराट दोघेही चिमुकल्या वामिकासोबत एअरपोर्टवर दिसलेत. यावेळीही वामिकाचा चेहरा अनुष्काने झाकून ठेवला होता. पापाराझींना तिचा चेहरा दिसू नये, यासाठी तिला आटापिटा सुरू होता. याच नादात अनुष्का काही लोकांच्या निशाण्यावर आली. (Anushka Sharma covers Vamika  face at airport )

बुधवारी रात्री अनुष्का, विराट व वामिका टीम इंडियासोबत इंग्लंडला रवाना झालेत. यावेळी अनुष्काने वामिकाला छातीशी घट्ट कवटाळले होते. तिचा चेहरा दिसू नये, यासाठी अनुष्काचे प्रयत्न सुुरू होते.

सोशल मीडियावर विमानतळावरचे याचे काही फोटो  व व्हिडीओ व्हायरल झालेत आणि ते पाहून युजर्सनी अनुष्काला ट्रोल करणे सुरु केले.अरे यार, त्या पोरीचा श्वास  गुदमरत असेल, अशी कमेंट एका युजरने केली.

तर अन्य एकाने कोरोना महामारीत इतक्या छोट्या मुलीला घेऊन प्रवास केल्याबद्दल अनुष्काला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अर्थात अनेकांनी यावेळी फोटोग्राफर्सवरही राग काढला. त्यांच्या प्रायव्हर्सीचा सन्मान करा, त्यांनी मुलीचे फोटो क्लिक करायला मनाई केली आहे, तेव्हा थांबवा, अशा शब्दांत अनेकांनी आपला संताप व्यक्त केला.यावर्षी 11 जानेवारीला अनुष्का आई झाली. परंतु, मुलीच्या जन्मानंतरच विराट आणि अनुष्काने सर्व माध्यमातील व्यक्ती आणि कॅमेरामन इत्यादींना पत्र पाठवून आपल्या मुलीचे फोटो क्लिक करू नयेत, अशी विनंती केली होती. परंतु, यानंतरही सतत वामिकाचे फोटो क्लिक केले जात आहेत. 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली