Join us

स्वतःचा फोटो पाहून भारावली अनुष्का शर्मा, नवीन वर्षासाठी केले खास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 7:17 PM

ऑगस्ट 2020 रोजी विराटने अनुष्कासोबतचा एक गोड फोटो ट्विटरवर शेअर केला होता. शिवाय यासोबत एक गोड बातमी दिली होती. आपण बाबा बनणार असल्याची गुडन्यूज या फोटोसोबत त्याने दिली होती. ‘जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार...’असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते.

सध्या अनुष्का शर्मा तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. प्रेग्नंसीमध्ये तिचे काम करणे असो किंवा मग तिची ड्रेसिंग स्टाइल स्टेटंमेंट असो अनुष्का या सगळ्या गोष्टींमुळे सतत चर्चेत राहते. आता पुन्हा एकदा अनुष्का शर्मा चर्चेत आहे. यावेळी कारणही तसे खासच आहे. कारण एरव्ही इतरांना आपल्या लूकने भुरळ पाडणारी अनुष्का सध्या स्वतःच्याच प्रेमात पडली आहे. 

तिचा बोल्ड अवतारातील बेबी बंम्प फ्लॉन्ट करतानाचा फोटो पाहून तिची नजरच हटत नाहीय, हा फोटोही तिच्यासाठी खासच आहे कारण फॅशन आणि लाइफस्टाईल साठी प्रसिध्द असलेले वोग इंडिया मासिकावर तिचा कव्हरसाठी तिने खास फोटोशूट केले आहे.  

 

जानेवारी 2021 च्या एडिशनसाठी हे फोटोशूट करण्यात आले  आहे.नेहमीप्रमाणे या फोटोमध्येही अनुष्का बेबी बंम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय. फोटोत तिचा बोल्ड लूक पाहायला मिळतो. याच फोटोशूटच्या प्रेमात सध्या अनुष्का शर्मा पडली आहे. 

विरूष्काने दिली आणखी एक ‘गुड न्यूज’, हा गोड फोटू ठरला सर्वाधिक लाईक्स मिळवणारा फोटो

यावर्षी ऑगस्टमध्येच अनुष्का व विराटने सोशल मीडियावर आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती.आता या कपलने चाहत्यांना आणखी एक गुडन्यूज दिली आहे. ती काय तर या कपलचा फोटो ट्विटरवर 2020 या वर्षात सर्वाधिक लाईक्स मिळवणारा फोटो ठरला आहे.

आयपीएल सुरु होण्यापूर्वी 27 ऑगस्ट 2020 रोजी विराटने अनुष्कासोबतचा एक गोड फोटो ट्विटरवर शेअर केला होता. शिवाय यासोबत एक गोड बातमी दिली होती. आपण बाबा बनणार असल्याची गुडन्यूज या फोटोसोबत त्याने दिली होती. ‘जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार...’असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते.

अनुष्का अवघ्या काही दिवसांत आई होणार आहे 

आयपीएल सुरु होण्यापूर्वी 27 ऑगस्ट 2020 रोजी विराटने अनुष्कासोबतचा एक गोड फोटो ट्विटरवर शेअर केला होता. शिवाय यासोबत एक गोड बातमी दिली होती. आपण बाबा बनणार असल्याची गुडन्यूज या फोटोसोबत त्याने दिली होती.

जानेवारीमध्ये अनुष्का तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. अलीकडेच दोघांच्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवस झाला. या निमित्ताने विराट आणि अनुष्काने सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत स्पेशल मेसेज लिहिला होता

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली