ठळक मुद्दे आतापर्यंत वेगवेगळ्या आशयांच्या सिनेमात काम केले - अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने १० वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००८ मध्ये अनुष्काचा पहिला चित्रपट 'रब ने बना दी जोडी' प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळेच तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. अनुष्काने बॅण्ड बाजा बारात, 'सुल्तान', 'पिके', 'एनएच१०', 'झिरो' सारख्या चित्रपटात काम केले. या चित्रपटांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या. या दहा वर्षात अनुष्काने फक्त अभिनयातच नाही तर निर्मिती व बिझनेसमध्ये आपले कौशल्य आजमावले व त्यातही ती यशस्वी ठरली.
याबाबत तिने पीटीआयला सांगितले की, मी आतापर्यंत वेगवेगळ्या आशयांच्या सिनेमात काम केले. माझ्या प्रवृत्तीमुळे मी एका साचेबद्ध भूमिकांमध्ये अडकून पडले नाही. त्यामुळेच माझे करियर यशस्वी झाले. त्यामुळे सिनेइंडस्ट्रीत माझी वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
अनुष्काने पुढे सांगितले की, माझा नशीबावर खूप विश्वास आहे. जर मला रिस्की वाटले तर मी ते काम करत नाही. जे मला अर्थपूर्ण वाटते तेच काम मी करते. माझे मन मला जे सांगते ते मी करते. अनुष्काने मी एन एट १० व परी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटातील कॉन्टेन्टमुळे क्लीन स्लेट फिल्म्स नावारुपास आले.
चित्रपट मोठा आहे की छोटा यापेक्षा आशय खूप महत्त्वाचा असतो. प्रेक्षक मनोरंजन म्हणून सिनेमाकडे पाहतात, असेही तिने सांगितले.
अनुष्का शर्माचा नुकताच झिरो चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरूख खान व कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. आता ती कनेडा वेबसीरिजची निर्मिती करते आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नवदीप सिंग करणार आहे. सध्या माझ्याकडे या सीरिजची स्क्रीप्ट आहे. अद्याप याचा कामाला सुरूवात झालेली नसल्याचे अनुष्काने सांगितले.