Join us

Anushka Sharma Pregnancy: अनुष्का शर्माच्या दुसऱ्या प्रेग्नंसीत अडचणी? लंडनमध्ये सुरु आहेत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 12:14 PM

Anushka Sharma Pregnancy: विराट-अनुष्का अनेक दिवसांपासून लंडनमध्येच आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्यांदा गरोदर आहे. सध्या विराट कोहली (Virat Kohli) अनुष्कासोबत लंडनमध्ये आहे. तिथेच ती बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र आता अनुष्काच्या प्रेग्नंसीत काही अडचणी असल्याने ती लंडनमध्ये उपचार घेत असल्याचं बोललं जात आहे. याबद्दल अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच ए बी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) एका लाईव्ह सेशनमध्ये विराट अनुष्काबाबत गुड न्यूज दिली होती. मात्र नंतर त्याने स्टेटमेंट मागे घेत माफी मागितली. आता अनुष्काच्या प्रेग्नंसीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

भारत विरुद्ध इंग्लंड मध्ये सुरु असलेल्या संपूर्ण टेस्ट सीरिजसाठी विराट कोहली अनुपस्थित राहिला. कौटुंबिक कारणांमुळे तो सध्या रजेवर असल्याचं त्याने बीसीसीआयला कळवलं. त्याची पत्नी अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे हे तर आता सर्वांनाच माहित आहे. मात्र ते दोघंही अनेक दिवसांपासून लंडनमध्येच आहेत. विराटच्या गैरहजेरीमागे मागे अनुष्काच्या प्रेग्नंसीचंच कारण आहे का की आणखी काही असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मध्यंतरी विराटची आई आजारी असल्याचीही चर्चा होती मात्र हे खोटं असल्याचं विराटचा भाऊ म्हणाला. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार आता  अनुष्काच्या प्रेग्नंसीत काही अडचणी आहेत. म्हणून कोहली कुटुंब लंडनमध्येच उपचार घेत आहे. त्यांना प्रायव्हसी दिली पाहिजे तसंच त्यांच्या ख्याली खुशालीसाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

एबी डिव्हिलियर्स काय म्हणाला होता?

एबी डिव्हिलियर्सने आधी विराट अनुष्का लवकरच दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहेत अशी गुडन्यूज दिली होती. मात्र नंतर त्याने आणखी एक स्टेटमेंट दिलं. यामध्ये तो म्हणाला, " क्रिकेटच्या आधी कुटूंब... मी माझ्या यू ट्युब चॅनेलवर खूप मोठी चूक केली. ती माहिती चुकीची होती आणि त्यात तथ्य नव्हते. विराटसाठी नेहमीच कुटूंब हे प्राधान्य राहिले आहे. तिथे नेमकं काय घडत आहे, हे कुणालाच माहित नाही. मी त्याला आता फक्त शुभेच्छा देऊ शकतो. त्याच्या विश्रांती मागे काही कारण असलं तरी तो दमदार पुनरागमन करेल, अशी मला आशा आहे."

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीप्रेग्नंसी