अनुष्का शर्माचे (Anushka Sharma)फॅन्स दीर्घकाळापासून तिच्या कमबॅकच्या प्रतीक्षेत होते. आज गुरूवारी अनुष्काने आपल्या आगामी मेगा प्रोजेक्टची घोषणा केली. अनुष्का 3 वर्षानंतर कमबॅक करतेय. तिच्या आगामी या सिनेमाचं नाव आहे, ‘चकदा एक्प्रेस’ (Chakda Xpress ). नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या चित्रपटात अनुष्का एका महिला क्रिकेटपटूची भूमिका साकारणार आहे. ती कोण तर भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार झूलन गोस्वामी (Jhulan Goswami).
होय, मेकर्सने ‘चकदा एक्प्रेस’चा टीजर व्हिडीओ रिलीज केला आहे. यात अनुष्काचा फर्स्ट लूक पाहायला मिळतोय. अनुष्काला झूलनच्या रूपात पाहून चाहते खूश्श आहेत. पण सोबत ट्रोलर्सही अॅक्टिव्ह झाले आहेत.
अनुष्का कोणत्याही अँगलने झूलन दिसत नाही. हाईट, स्किन कलकर, बंगाली एक्सेंटपसून तर लूक्सपर्यंत, काहीही झूलनची मॅच होत नाही,असं अनेक युजर्सचं म्हणणं आहे.
अनुष्का झूलन सोडून सर्व काही दिसतेय, असं एका युजरने लिहिलं आहे. ही चित्रपट फ्लॉप करेल. यापेक्षा झूलनलाच घ्यायचं असतं, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.
‘अरे भाई, झूलन और अनुष्का कहां मिलती है, थोडा भी,’अशी कमेंट एका युजरने केले आहे. कास्टिंग डायरेक्टरने माफी मागावी, अशी थेट मागणीच एका युजरने केली आहे. अर्थात अनुष्काला सपोर्ट करणारेही आहेत. त्यांना अनुष्काचा लूक आवडला आहे.
अनुष्का सुमारे 3 वर्षांनंतर या चित्रपटाद्वारे कमबॅक करतेय. साहजिकच हा चित्रपट तिच्यासाठी खूपच खास आहे. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टावर भली मोठी पोस्ट लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘ कथा एका मोठ्या त्यागाची आहे.या चित्रपटामुळे जगाचे डोळे उघडतील, असं तिने यात म्हटलं आहे.झूलन गोस्वामी हे भारतीय क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे. ती भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार असून भारताची सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ती ओळखली जाते. झूलनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तिने असे अनेक विक्रम केले आहेत जे मोडणं जगभरातील खेळाडूंना कठीण जात आहे.