Join us

रणबीर कपूरच्या खोड्या अन् अनुष्का शर्माचा वैताग!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 15:08 IST

अलीकडे रणबीर व अनुष्का या दोघांनी एका इव्हेंटमध्ये एकत्र हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये अनुष्काने एक मोठा खुलासा केला.

ठळक मुद्देरणबीर  व अनुष्काने आत्तापर्यंत चार चित्रपटांत एकत्र काम केले आहे.  पीके, बॉम्बे वेलवेट, ऐ दिल है मुश्किल आणि संजू हे ते चार चित्रपट.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहे. त्यापूर्वी रणबीर ‘संजू’ या चित्रपटात दिसला होता. बॉक्सआॅफिसवर विक्रमी कमाई करणाºया या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिया मिर्झा, अनुष्का शर्माही झळकल्या होत्या. अलीकडे रणबीर व अनुष्का या दोघांनी एका इव्हेंटमध्ये एकत्र हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये अनुष्काने एक मोठा खुलासा केला. होय, तीन वर्षांपूर्वी रणबीरने अनुष्कासोबत असे काही केले होते की तिला त्याच्या थोबाडीत हाणावी वाटली होती. वाचायला हे थोडे विचित्र वाटेल, पण खरे आहे.

 ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील एका दृश्यात अनुष्काने रणबीरच्या थोबाडीत मारली होती. या पार्श्वभूमीवर अनुष्काला एक प्रश्न विचारण्यात आला. खºया आयुष्यात तुला कधी रणबीरच्या थोबाडीत मारावी वाटली का? असा तो प्रश्न. या प्रश्नावर अनुष्का नकारार्थी उत्तर देईल, असा सगळ्यांचा अंदाज होता. पण झाले उलटेच. मला नेहमीच त्याच्या थोबाडीत मारायचे होते, असे अनुष्का म्हणाली. रणबीरला आॅनस्क्रीन मारण्यासाठी मला सांगण्यात आले होते. पण खºया आयुष्यात मला सांगण्याची गरज नाही. तो मला प्रचंड छळतो. तीन वर्षांपूर्वी एकत्र काम करताना त्याने अनेकदा माझ्या कपड्यांना हात पुसलेत. माझ्या हातावर शिंकला, असे अनुष्का म्हणाली. अनुष्का हे सांगत होती आणि रणबीर हसत होता.रणबीर  व अनुष्काने आत्तापर्यंत चार चित्रपटांत एकत्र काम केले आहे.  पीके, बॉम्बे वेलवेट, ऐ दिल है मुश्किल आणि संजू हे ते चार चित्रपट. साहजिकचं दोघांत चांगले बॉन्डिंग आहे. याच बॉन्डिंगमधून अनुष्काच्या खोड्या काढायची संधी रणबीर कधी कधी घेतो. बाकी काय?

टॅग्स :अनुष्का शर्मारणबीर कपूर