Join us  

विराट कोहलीच्या आधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती अनुष्का, कोण आहे तो सुपरस्टार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 11:51 AM

आज आपण जाणून घेऊयात विराटपूर्वी अनुष्काच्या जीवनात आलेल्या किंवा नाव जोडण्यात आलेल्या एका अभिनेत्याबाबत.

भारताचा क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli ) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची प्रेमकहाणी सर्वश्रुत आहे. क्रिकेट असो वा बॉलिवूड दोन्हीकडे या जोडप्याची चर्चा होत असते. विराटशी लग्न करण्यापुर्वी मात्र अनुष्काचं नाव कथितरीत्या काही अभिनेत्यांंशी जोडलं गेलं होतं. त्याची चर्चाही झाली होती. आज आपण जाणून घेऊयात विराटपूर्वी अनुष्काच्या जीवनात आलेल्या किंवा नाव जोडण्यात आलेल्या एका अभिनेत्याबाबत. विशेष म्हणजे हा अभिनेताहीदेखील लोकप्रिय असून त्याने सुपरहीट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. 

खुद्द अनुष्काने एका मुलाखतीमध्ये कबूल केलं होतं, ती एका अभिनेत्याकडे आकर्षित झाली होती.  तो अभिनेता म्हणजे रणवीर सिंग (Ranveer Singh). सिमी गरेवालशी बोलताना अनुष्काने रणवीरवर भाष्य केलं होतं. अनुष्का शर्मा म्हणाली, 'जर लोक आम्हाला खरोखर चांगले ओळखत असतील, तर त्यांना हे समजेल की आम्ही दोघेही खूप वेगळे आहोत. आमचं एक अतिशय अस्थिर नाते आहे. मला तो आवडतो आणि तो आकर्षक आहे. सध्या एखाद्या अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहणे माझ्यासाठी थोडे कठीण आहे. मी रणवीरकडे आकर्षित झाले होते. मला तो एक चांगला व्यक्ती वाटला. पण ते इतकंच. ते फक्त आकर्षण होतं'. 

अनुष्का शर्माने मनीष शर्माच्या 'बँड बाजा बारात' (2010) चित्रपटात रणवीर सिंगसोबत काम केले होते. हा सिनेमा 10 डिसेंबर 2010 रोजी जगभरात प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. त्या सिनेमानंतर दोघेही एकमेंकाना डेट करत असल्याची चर्चा होती.

अनुष्का शर्माने विराट कोहलीने २०१७ च्या अखेरीस इटलीमध्ये विवाह केला होता.  २०२१ मध्ये अनुष्का आणि विराटला कन्यारत्न झाले होते. तिचं नाव वामिका असं ठेवण्यात आलं होतं.  तर फेब्रुवारी महिन्यात अनुष्का आणि विराट हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. अनुष्काने एका गोंडस मुलाला जन्म दिला. 'अकाय' (Akaay) असं बाळाचं नाव ठेवण्यात आलं. 

अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच दिवसांपासून 'चकदा एक्सप्रेस' मुळे चर्चेत होती. पण हा चित्रपट अजून रिलीज झालेला नाही. हा चित्रपट थिएटरमध्ये नाही तर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो हे पाहणे बाकी आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीरणवीर सिंगबॉलिवूड