Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: विराटच नाही तर पत्नी अनुष्काही आहे तापट; नेटकरी म्हणाले, 'पूर्ण फॅमिलीच...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:42 IST

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या न्यूयॉर्क येथे टी 20 विश्वकप सुरु आहे. भारतीय संघ प्रत्येक सामना ताकदीने खेळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सर्वांना उत्सुकता असलेल्या 'भारत विरुद्ध पाकिस्तान'चा सामना रंगला. कित्येक क्रिकेटप्रेमी खास हा सामना प्रत्यक्षात पाहण्यासाठी आले होते. भारताने याहीवेळी बाप बाप होता है म्हणत पाकिस्तानला धूळ चारली. दरम्यान या मॅचवेळचा अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ती प्रचंड रागात दिसत आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. किंग कोहली आणि पत्नी अनुष्का यांच्यावर चाहत्यांचं नेहमीच लक्ष असतं. सामन्यावेळी विराट कोहली एकीकडे फक्त ४ धावा करत आऊट झाला. तर दुसरीकडे स्टेडियममध्ये बसलेली अनुष्का रागात दिसली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ती कोणाशी तरी रागात बोलताना दिसत आहे. 

अनुष्काचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही चांगलीच मजा घेतली. 'भैय्या 4 रन वर आऊट, वहिनी रागात दिसत आहे','कोहली कुटुंबच खूप आक्रमक आहे' अशा कमेंट्स अनुष्काच्या व्हिडिओवर आल्या आहेत. तर काही जणांनी अनुष्काची बाजू घेत 'माणूस आक्रमक आणि आनंद अशा दोन्ही भावना व्यक्त करु शकतो' अशी कमेंट केली आहे.

अखेर भारत सामना जिंकल्यानंतर अनुष्काला विजयाचा आनंद साजरा करतानाही पाहिले गेले. विराट ४ धावांवर गेला तेव्हा ती थोडी नाराज झाली होती मात्र शेवटी रिझल्ट पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. 

टॅग्स :अनुष्का शर्माबॉलिवूडट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024