Join us  

Anushka Sharma : "लवकरच भेटू...", अनुष्का शर्माने शेअर केली पोस्ट, भारतात येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 1:14 PM

अनुष्का शर्मा ही जरी चित्रपटांपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.

Anushka Sharma and Virat Kohli : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहली हे कायमच चर्चेत असतात. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून अनुष्का शर्मा ही चित्रपटांपासून दूर आहे.  अनुष्का शर्मा ही जरी चित्रपटांपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही अनुष्का शर्मा ही शेअर करताना दिसते. यातच तिच्या एका पोस्टने लक्ष वेधलंय.

सध्या अनुष्का आपल्या मुलांसोबत लंडनमध्ये आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांचा आनंद घेत आहेत. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. पहिल्या मुलीनंतर अनुष्का आता एका मुलाची आई बनली आहे. शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबतच्या 'झिरो' चित्रपटानंतर अनुष्काने तिच्या अभिनय करिअरमधून ब्रेक घेतला. आता, अकायच्या जन्मानंतर सात महिन्यांनी अनुष्का ही भारतात परतणार असल्याचं समोर आलं आहे. 

अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टा स्टोरीजवर एक प्रमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एका हेल्दी फूड आणि स्नॅक्स ब्रँडने स्पर्धेची घोषणा केली आहे, ज्याद्वारे चाहत्यांना मुंबईतील एका कार्यक्रमात अनुष्काला भेटण्याची संधी मिळेल. व्हिडीच्या कॅप्शनमध्ये अनुष्कानं "लवकरच भेटू" असं लिहलं आहे. यावरुन ती लवकरच भारतात असणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. 

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर  2019 मध्ये ती झिरो चित्रपटात दिसली. मात्र, झिरो चित्रपट फ्लाॅप गेला. अनुष्का शर्मा आणि शाहरूख खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते, तरीही हा चित्रपट फ्लाॅप गेला. तर अनुष्काचा 'चकदा एक्सप्रेस' हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नाही. माजी महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे. अनुष्काने झुलन गोस्वामीची भूमिका साकारली आहे.

टॅग्स :अनुष्का शर्मासेलिब्रिटीबॉलिवूडभारतविराट कोहली