Join us

अनुष्का शर्माने फ्रेंडशिप डेनिमित्त शेअर केला फोटो; तिला ओळखणेही झाले मुश्कील!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 17:40 IST

लहानपणीच्या आठवणी आपल्याला सगळयांनाच भावूक करतात. जुने फोटो पाहिले की आपण लगेचच आठवणीत रमतो. आता अशीच अवस्था झालीय अनुष्काची. तिने जो फोटो पोस्ट केलाय त्यात सर्व लहान मुले-मुली आहेत.

 अनुष्का शर्मा ही बॉलिवूडच्या सर्वांत हॉट अभिनेत्रींपैकी एक़ ती एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली निर्माता देखील आहे. दर्जेदार चित्रपटात तिने कामही केलंय आणि उत्कृष्ट चित्रपटांची निर्मितीही तिने केलीय. लग्नानंतर ती तिच्या वैवाहिक आयुष्यात चांगलीच रमलीय. मात्र, असं असतानाही ती तिच्या फॅन्सना विसरलेली नाहीये. आज सोशल मीडियावर सर्वजण आपल्या जुन्या-नव्या मित्रांचे फोटो पोस्ट करत फ्रेंडशिप डे एन्जॉय करत आहेत. मग तिनेही तिचा हा फोटो पोस्ट केला. तरीही चाहते तिला या फोटोत ओळखू शकले नाहीत. बघायचाय तुम्हाला तो फोटो...

लहानपणीच्या आठवणी आपल्याला सगळयांनाच भावूक करतात. जुने फोटो पाहिले की आपण लगेचच आठवणीत रमतो. आता अशीच अवस्था झालीय अनुष्काची. तिने जो फोटो पोस्ट केलाय त्यात सर्व लहान मुले-मुली आहेत. ते सर्वजण तिचे मित्र-मैत्रिणी असल्याचे दिसून येत आहे. या फोटोत ती कोण आहे, हे ओळखू येणे कठीण आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगू शकतो की, मध्यभागी अगदी आनंदाने जी हसत आहे, जिने पोनीटेल घातलेली आहे. ती अनुष्का असून या फोटोला तिने कॅप्शन देखील दिले आहे. अनुष्का लिहिते की, तुमच्या आयुष्यात प्रत्येकाचा रोल तेवढाच महत्त्वपूर्ण असतो. मित्रच असतात जे तुम्हाला कायम साथ देतात. काही आठवणीत राहतात, तर काहींच्या आठवणीनेही आपल्या चेहऱ्यावर स्माईल येऊन जाते. यासोबतच तिने सर्व चाहत्यांनाही फ्रेंडशिप डे विश केले आहे. 

अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबाबतीत बोलायचे झाल्यास, अनुष्का ‘झिरो’ या चित्रपटात ती शाहरूख खानसोबत दिसली होती. आता ती पूर्व क्रिकेट कॅप्टन झूलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये दिसण्याची शक्यता आहे. तिच्याकडून अद्याप कुठलीच ऑफिशिअल माहिती मिळालेली नाहीये.

टॅग्स :अनुष्का शर्माफ्रेंडशिप डे