Join us  

रात्री किती वाजता जेवते अनुष्का शर्मा ? लेक वामिकामुळे बदललं अभिनेत्रीचं रुटिन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 12:06 PM

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अनुष्काने पालक म्हणून तिचा अनुभव कसा आहे, याविषयी काही रंजक गोष्टी सांगितल्या.

Anushka Sharma :  अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohali) यांची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. हे दोघेही एक कपल म्हणून नाही तर एक उत्तर पालक म्हणूनही आदर्श ठेवत आहेत. मुलगी वामिका आणि मुलगा अकाय या दोघांचं संगोपन करण्यात अनुष्का आपला पुर्ण वेळ देत आहे. पालक झाल्यापासून अनुष्काच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अनुष्काने पालक म्हणून तिचा अनुभव कसा आहे, याविषयी काही रंजक गोष्टी सांगितल्या.

अनुष्का ही मुलगा अकायला जन्म दिल्यानंतर लंडनमध्येच होती. तेव्हापासून चाहते ती भारतात कधी येते, याची वाट पाहत होते.  अखेर अनेक महिन्यांनंतर अनुष्का नुकतंच भारतात आली आहे. मुंबईत येताच तिने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.  यावेळी बोलताना ती म्हणाली, माझी लेक ही साधारणत: संध्याकाळी ५.३० वाजता तिचं रात्रीचं जेवण जेवायची आणि त्यानंतर झोपते.  मीही घरी एकटी असते मग मीही तिच्यासोबतच लवकर जेवून झोपायला सुरूवात केली". 

अनुष्का पुढे म्हणाली, "हळुहळू याची मला सवय झाली आणि त्याचे फायदे दिसू लागले. मला चांगली झोप लागायची. सकाळ झाल्यावर फ्रेश वाटायचं. डोक्यावरचा ताण हलका व्हायचा. मी याबद्दल कुठेच वाचलं नव्हतं. याची मला सवय झाली आणि बदल जाणवला.  प्रत्येकासाठी हे रुटिन सोपं नसतं. पण, आता हळुहळू आमचं संपूर्ण घर आमच्यासारखं वागू लागलं आहे. सगळे आम्हा दोघींना फॉलो करतात", असं अनुष्का शर्माने सांगितलं.

दरम्यान, अनुष्का आणि विराट कोहली दोन्ही मुलांसह लंडनमध्येच स्थायिक झाल्याच्या चर्चा आहेत.  अनुष्का एकटीच ब्रँड एंडॉर्समेंट्स आणि वर्क कमिटमेंट्समुळे भारतात आली. फुल ब्लॅक आऊटफिट, ब्लॅक गॉगल अशा लूकमध्ये ती दिसली. पापाराझींसमोर तिने पोज दिली आणि नंतर ती कारमध्ये बसून रवाना झाली. सेलिब्रिटी फोटोग्राफर्सने अनुष्काचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीसेलिब्रिटीबॉलिवूड